आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडेलला विवस्त्र करून किडनॅपर दररोज करायचा टॉर्चर, त्यालाच प्रेमजालात अडकवून केली सुटका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - इटलीमध्ये गतवर्षी किडनॅपर्सच्या तावडीतून पळून आलेल्या ब्रिटिश मॉडेल कोले एलिंगने बीबीसीच्या एका कार्यक्रमात आपली कहाणी शेअर केली आहे. एलिंगला 6 दिवस डांबून ठेवण्यात आले होते. यादरम्यान तिला नशेचे इंजेक्शन देण्यात येत होते. तिला विवस्त्र करून टॉर्चर करण्यात आले. परंतु जेव्हा ती आपल्या देशात परतली, तेव्हा तिच्यावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले. तिच्या कहाणीवर कोणीही विश्वास ठेवायला तयार होईना. तिच्यावर पब्लिसिटीसाठी स्वत:च्या किडनॅपिंगचा आरोप लागला. तथापि, आरोपीला 16 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. दुसरीकडे, एलिंग म्हणतेय की, तिने किडनॅपरशी प्रेमाचे नाटक करून आपला जीव वाचवला.

 

ड्रग्जचे दिले इंजेक्शन अन् बनवले बंधक
लंडनची रहिवासी कोले एलिंगने सांगितले की, गतवर्षी जुलैमध्ये 30 वर्षीय लुकाज हर्बाने तिला एका फोटोशूटसाठी मिलानला बोलावले होते. परंतु तेथे जाताच तिला किडनॅप करण्यात आले. तिला केटामाइन ड्रगचे इंजेक्शन देण्यात आले, कपडे उतरवून हातकडी घालून एका भल्यामोठ्या बॅगमध्ये टाकण्यात आले. यानंतर तिला गाडीच्या डिकीत टाकून मिलानपासून 120 किमी अंतरावरील एका फार्महाऊसवर नेण्यात आले. येथे हर्बाने तिला 3 लाख युरोची डिमांड केली. तो म्हणाला की, जर मी पैशांचा बंदोबस्त केला नाही, तर तो मला सेक्स गुलाम म्हणून विकेल.

 

किडनॅपरशी केले प्रेमाचे नाटक
एलिंगने सांगितले की, हे सर्व पाहून मी आणखीनच घाबरले. मला वाटले की, तो जे काही बोलतोय ते सर्व खरेच करून दाखवील. यादरम्यान मला त्याची एक गोष्ट खटकली. त्याने मला विचारले की, तो मला किस करू शकतो का, आणि आपल्या दोघांत काही नाते बनू शकते का? एलिंग म्हणाली की, मला वाटले हीच चांगली संधी आहे. याचा वापर करून मी त्याच्या तावडीतून पळून जाऊ शकते. म्हणून मीही त्याला होकार दिला आणि त्याची प्रतिक्रिया पाहू लागले. खरेतर तोच या नात्यासाठी उतावीळ होता. एलिंगने सांगितले की, काही दिवस गेल्यावर हर्बाला कळून चुकले की त्याला खंडणीची रक्कम मिळणार नाही. यामुळे त्याने मला मिलानमधील ब्रिटिश एम्बेसीबाहेर सोडले.

 

पैसे न मिळाल्याने सोडले एम्बेसीबाहेर
एलिंगने हेही सांगितले की, संशयाला कुठून सुरुवात झाली? एम्बेसी उघडण्याची प्रतीक्षा करत ती आणि हर्बा एका कॅफेमध्ये टाइमपास करत होते. तेव्हा काही जणांनी आम्हाला पाहिले होते. यावरून या घटनेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. यानंतर प्रकरण कोर्टात गेल्यावर आपल्या बचावात हर्बानेही दावा केला की, तो एलिंगला यापूर्वीच भेटलेला आहे आणि तिच्यावर प्रेम करू लागला होता. एवढेच नाही, त्यानेही दावा केला की, एलिंग पब्लिसिटी मिळवण्यासाठी एक स्कँडल उभे करत आहे, जेणेकरून सहानुभूती मिळवून तिला करिअरमध्ये मदत मिळेल.

 

देशाला नाही माझ्यावर विश्वास
एलिंगने आपल्या स्पष्टीकरणात सांगितले की, मी हर्बासोबत राहताना स्वत:चा मूड का खराब करून घेतला असता? तो मला पसंत करू लागला होता आणि याच भावनेमुळे तो माझी सुटका करत होता. मी तर त्याला खुश करण्याचा प्रयत्न करू लागले होते. परंतु ही गोष्ट लोकांच्या गळी उतरली नाही. तिने स्वत:ची प्रतिमा मलिन करण्यासाठी मीडियालाही जबाबदार ठरवले. ती म्हणाली की, मीडियामुळे लोकांनी तिच्यावर प्रचंड टीका केली. मी कधीही विचार केला नव्हता की, एवढा वाईट काळ पाहावा लागेल.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, ब्रिटिश मॉडेल कोले एलिंगचे आणखी Photos व Video    

 

 

बातम्या आणखी आहेत...