आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नंट महिलेच्या अल्ट्रासाउंडवर बाळाचा फोटो पाहताच हादरले डॉक्टर, भयंकर 'प्लेसेंटा प्रीव्हिया' कंडिशननंतर दिला बाळाला जन्म

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

6 फूट सात इंच उंचीची हॅली लहानपणापासूनच नॉर्मल माणसांपेक्षी वेगळी दिसायची. तिचे मित्र म्हणायचे की, ती ज्याच्याशीही लग्न करेल, त्याची हाइट जरूर सात फूट असेल. परंतु हॅलीने ब्रायनशी लग्न केले, जो 5 फूट 8 इंचांचा होता. नुकतेच TLCच्या एका शोमध्ये My Giant Life मध्ये तिने लग्नानंतरच्या गर्भावस्थेतची वेदनादायी कहाणी शेअर केली आहे. ती म्हणाली की, प्रेग्नेंसीदरम्यान तिला प्लेसेंटा प्रीव्हिया कंडिशनमधून जावे लागले. दुसरीकडे, तिचा अल्ट्रासाउंड रिपोर्ट पाहून डॉक्टरही हादरले होते. वास्तविक, लग्नाच्या आधी अनेक डॉक्टरांनी हॅलीची हाइट पाहून तिची प्रेग्नन्सी रिस्की असल्याचे सांगितले होते. यामुळे जेव्हा ती प्रेग्नंट झाली तेव्हाही तिलाही धक्का बसला. परंतु शेवटी तिने एका सुदृढ मुलीला जन्म दिला.

 

अल्ट्रासाउंड पाहून हादरले होते डॉक्टर...
- हॅली जेव्हा आठ महिन्यांची प्रेग्नेंट होती, तेव्हा डॉक्टरांनी तिचे अल्ट्रासाउंड केले. त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. रिस्कच्या उलट तिचे भ्रूण वेगाने विकसित होत होते. नॉर्मल मुलांच्या तुलनेत त्याची साइज दुप्पट होती.

- या रिझल्टनंतर डॉक्टरांनी एक्स्ट्रा अल्ट्रासाउंड करण्याचा सल्ला दिला. यानंतर डॉक्टरांनी अल्ट्रासाउंड स्क्रीनवर बाळ पाहिले तेव्हा हॅली ओरडलीच. फोटोत दिसत असलेले बाळ खूपच भीतिदायक दिसत होते. हॅलीची भीती योग्यच होती, कारण डॉक्टरांनी नोटीस केले की, तिला 'प्लेसेंटा प्रीविया' आहे.

 

काय असतो प्लेसेंटा प्रीविया?
- जेव्हा प्लेसेंटा महिलेच्या गर्भाशयाच्या खालच्या भागात असतो. तेव्हा या कंडीशनमध्ये तो गर्भाशय ब्लॉक करतो. यावरून लेबर पेनदरम्यान आणि नंतर भयंकर ब्लीडिंग होते. ही कंडीशन महिलेसाठी एखाद्या दु:स्वप्नापेक्षा कमी नाही.

 

तरीही नाही हरली हिंमत
- हॅलीने धीर सोडला नाही, तिने भयंकर वेदना सहन करतच बाळाला जन्म दिला. तिने सांगितले की, ज्या दिवशी तिला मुलगी झाली, त्या दिवशी व्हॅलेंटाइन डे होता. तो दिवस तिच्या आयुष्यात खास ठरला. तिच्या मुलीचे वजन 3.8 किलोग्रॅम होते आणि ती 21 इंच उंच होती. नॉर्मल मुलांचे वजन 3.5 किलोग्रॅम असते.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, Video आणि Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...