आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Shocking: अपघातानंतर डॉक्टरांनी कापला पाय, पेशंटने घरी नेऊन मित्रांनाच शिजवून खाऊ घातला Man Claims To Have Fed His Own Amputated Leg And Served It To Friends

Shocking: अपघातानंतर डॉक्टरांनी कापला पाय, पेशंटने घरी नेऊन मित्रांनाच शिजवून खाऊ घातला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकी रेडिट युजरने हा धक्कादायक प्रकार शेअर केला आहे. - Divya Marathi
अमेरिकी रेडिट युजरने हा धक्कादायक प्रकार शेअर केला आहे.

> रेडिट युजरचा खुलासा, स्वत:च्या पायाचे मांस शिजवले.

> 11 मित्रांना इनव्हाइट करून त्यांनाही खाऊ घातले स्वत:चे मांस.
> रस्ते अपघातानंतर कापला लागला होता तरुणाचा पाय.

 

इंटरनेशनल डेस्क - अमेरिकेतील एका व्यक्तीने रेडिटवर खळबळजनक खुलासा केला आहे. IncrediblyShinyShart नावाच्या रेडिट यूजरचे म्हणणे आहे की, त्याने आपल्या पायाचे मांस स्वत: शिजवून आपल्या मित्रांना खाऊ घातले आहे. युजर म्हणाला, दोन वर्षांपूर्वी रस्ते अपघातात त्याला त्याचा पाय कापावा लागला होता. यूजरने हेही सांगितले की, याची चव एकदम बफेलो मीटसारखीच होती, ते दातांनी चावणे सोपे नव्हते.

 

डॉक्टरांना विचारले, कापलेला पाय नेऊ का घरी? हो म्हणाले...

- डेलीमेलवर पब्लिश रिपोर्टनुसार, रेडिट यूजरने सांगितले की, 2016 मध्ये घाटरस्त्यावर एका कारने त्याच्या बाइकला धडक दिली होती. या अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती.
- युजरने सांगितले की, भयंकर दुखापतीमुळे त्याला त्याचा पाय कापावा लागला. तेव्हाच मी डॉक्टरांना विचारले होते की, मी माझा हा कापलेला पाय सोबत नेऊ शकतो का? डॉक्टर तेव्हा हो म्हणाले होते.
- हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर एका बायोबॅगमध्ये मला माझा कापलेला पाय फ्रीज करून देण्यात आला. घरी गेल्यावर मीही लगेच फ्रीजरमध्ये ठेवला.

 

घरी नेल्यावर आली शिजवण्याची आयडिया
- यानंतर माझ्या डोक्यात हा पाय शिजवण्याची आयडिया आली. युजर म्हणाला की, माझे काही जवळचे मित्र नेहमी याबाबत चर्चा करायचो की, कायदेशीररीत्या जर मानवी मांस चाखण्याची संधी मिळाली तर जरूर आस्वाद घेऊ.
- या वेळी आमच्याकडे मांस होते आणि संधीही. यामुळे पाय कापल्यानंतर 3 आठवड्यांनी युजरने 11 मित्रांना जेवणासाठी आमंत्रित केले.
- त्याने आपल्या मित्रांना सांगितले की, तो आपल्या कापलेल्या पायाचे मांस शिजवणार आहे. त्याने सर्वांना विचारले की, तुम्ही याचा स्वाद घेऊ इच्छिता का? यावर त्याच्या 11 पैकी 10 मित्रांनी होकार दिला होता.
- या मित्रांमध्ये टेको (स्टफ करून बनवली जाणारी डिश) शेफ आणि त्याची गर्लफ्रेंडसेाबतच यूजरची एक्स-गर्लफ्रेंड आणि काही कॉलेजच्या दिवसांतील जवळचे मित्र सामील होते.

 

एक मित्राने खाताक्षणीच केली उलटी
- रेडिट युजर म्हणाला, यानंतर आम्ही सर्वांनी मिळून पायाच्या काही भागाचे मांस काढले आणि ते कांदा, लाल तिखट, लिंबू, काळे मिरे आणि काही मसाल्यांसोबत शिजवले.
- ते मक्के की रोटीसोबत रोल करून टोमॅटो सॉससोबत वाढले. युजर म्हणाला की, त्याच्या एका मित्राने खाताक्षणीच नॅपकिनमध्ये उलटी केली.
- युजर म्हणाला की, इतरांनीही पोर्कच्या स्वादाची अपेक्षा केली होती, परंतु ते बीफसारखे लागले होते. याचे मांसही खूप कडक होते, जे चावणे सोपे नव्हते.
- तो म्हणाला की, याची टेस्ट चांगली होती, परंतु एक्स्पिरियन्स चांगला नव्हता. युजरने याला 10 पैकी 6.5 रेटिंग दिली आणि म्हणाला की बर्गर आणि हॉट डॉग यापेक्षा कैकपटीने चांगले आहेत.
- तथापि, अमेरिकेत मानवी मांस खाण्यापासून रोखण्यासाठी कोणताही कायदा नाहीये.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचे Photos व Video... 

बातम्या आणखी आहेत...