आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Time Travel पुरावा: दावा करणाऱ्याने दाखवला इसवी सन 2120चा Video, जगाचा असा होणार अंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - सन 2030 मधून 2018 मध्ये परतल्याचा दावा करणाऱ्या अमेरिकेतील नोहाने पुन्हा एकदा व्हिडिओ जारी केला आहे. या वेळी त्याने दावा केला आहे की, त्याला सीक्रेट मिशनसाठी सन 2120 मध्ये पाठवण्यात आले होते, जेथे त्याने पाहिले की ग्लोबल वॉर्मिंगमुळे आभाळही लालेलाल होतील, चहुकडे विध्वंस होईल. नोहाने दाखवलेल्या व्हिडिओत उंचच उंच इमारतींच्या बरोबरीने उडणाऱ्या कार आणि लालजर्द ढग दिसत आहेत. हे पाहून लोकांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे. लोक म्हणाले की, हा व्हिडिओ एडिटिंग करून लोकांना मूर्खात काढत आहे. 

 

वर्तवली ही भाकिते...
- तो म्हणाला, तुम्ही विश्वास ठेवा. मला चांगलेच आठवते येणाऱ्या काळात भयंकर उष्णता होणार आहे. मी तेथील उष्णता अनुभवली आहे. उष्णतेमुळे सर्वकाही बेचिराख होईल. दुसरीकडे या व्हिडिओवर एक क्रिटिकने लिहिले, जर तू खरोखरच भविष्यातून आला आहेस, तर तिथलाच फोन का नाही वापरत? सध्याच्या काळातला फोन का वापरत आहेस? आणखी एका व्यक्तीने लिहिले, जर हा व्हिडिओ खराखुरा आहे, तर मग कॅमेरा स्थिर का आहे? तू खोटे बोलत आहेस.

 

लाय डिटेक्टरमध्ये झाला होता पास
- यापूर्वी नोहा तेव्हा चर्चेत आला होता, जेव्हा त्याने अमेरिकेच्या एका रेडिओ चॅनलला इंटरव्ह्यूमध्ये भविष्यातून परत आल्याची बाब सांगितली होती. यादरम्यान, नोहा लाय डिटेक्टर टेस्टमध्येही पास झाला होता. नोहाने भविष्यवाणी केली होती की, अमेरिकी प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प सर्व वादांनंतरही पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनतील. तो म्हणाला सन 2020 मध्ये डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडणुका जिंकतील. यासोबतच तेव्हा असे रोबोट्स असतील, जे आपले पूर्ण घर एकट्यानेच सांभाळू शकतील. नोहाने हाही दावा केला आहे की, 2020 पर्यंत मोबाइल फोनचा आकार अपेक्षेपेक्षा अनेक पटींनी वाढेल.

 

मंगळ ग्रहावर सुरू होईल येणे-जाणे
- नोहा पुढे म्हणाला की, 2028 मध्ये मानव मंगळ ग्रहावर येणे-जाणे सुरू करेल. आणि त्याच वर्षी टाइम ट्रॅव्हल आणि टाइम मशीनचा वापर सामान्य होईल. दुसरीकडे, कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांवर सहज उपचार केले जाऊ शकतील.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, नोहाने दाखवलेला इसवी सन 2120चा व्हिडिओ...