आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Miracle Baby Rescued Alive After Being Dumped In Drain 6 फूट खोल नाल्यातून येत होत रडण्याचा आवाज

6 फूट खोल नाल्यातून येत होत रडण्याचा आवाज, दिसले असे काही की बोलावले पोलिस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गटारीमध्ये नवजात बाळ आढळले. - Divya Marathi
गटारीमध्ये नवजात बाळ आढळले.

इंटरनेशनल डेस्क - साऊथ आफ्रिकेतून मन विचलित करणारा फोटो समोर आला आहे. येथे 6 फूट खोल गटारीमध्ये एक नवजात अर्भक आढळले. सकाळी येथून जाणाऱ्या लोकांनी बाळाच्या रडण्याचा आवाज ऐेकला. त्यांनी आधी स्वत:च बाळाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु खूप उंच असल्याने त्यात अडचणी येत होत्या. यानंतर लोकांच्या मदतीने बाळाला बाहेर काढले आणि पोलिसांना त्याची माहिती दिली. 

> 63 वर्षीय चारमैन किवी आपल्या कुत्र्यासह सकाळी पोर्ट एलिजाबेथला फिरायला निघाल्या होत्या, तेवढ्यात त्यांच्या श्वानाने गटारीकडे पाहून भुंकणे सुरू केले. 
> कुत्रे पुलावर चढून खाली उडी मारण्याचा प्रयत्न करू लागले. त्याला वाटले की, नालीमध्ये उतरून ते बाळाला वाचवू शकेल.
> किवी यांना आधी काहीच कळाले नाही, परंतु लक्षपूर्वक ऐकले तेव्हा रडण्याचा आवाज ऐकू आला. जवळ गेल्यावर ते बाळ असल्याचे दिसले. 
> त्यांनी लगेच तिथून जाणाऱ्या एका वाहनाला थांबवले आणि मदत मागितली. किवी यांनी कारमधून उतरलेल्या एका व्यक्तीसह मिळून ड्रेन उघडण्याचा प्रयत्न केला.
> यानंतर ते नाल्यातून खाली गेले आणि बाळाला तिथून बाहेर काढले. बाळाला लाल मुंग्या चावे घेत होत्या.
> वाटसरूंनी यानंतर इमरजेंसी सर्विसला कॉल केला. यानंतर पोलिस आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी आली आणि बाळाला डॉक्टरांकडे नेण्यात आले. बाळाची नाळही तुटलेली नव्हती.
> थंडी आणि पाण्यात पडून राहिल्याने नवजाताला हायपोथर्मिया और रेस्पिरेटरीचा त्रास झाला, यामुळे त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.
> बाळाला बेबी युनिटमध्ये ठेवण्यात आले, येथे नर्स त्याची देखभाल करत होत्या. बाळाचे नाव ग्रेस ठेवण्यात आले आहे. पोलिस बाळाच्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या घटनेशी निगडित आणखी फोटोज व व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...