आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिकस्थळी मॉडेलच्या न्यूड Photo Shootमुळे खळबळ, धर्मगुरूंच्या आक्षेपावर मॉडेल म्हणते- हे शरीर ईश्वराचीच निर्मिती!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेलने धार्मिक स्थळी नग्न फोटोशूट केल्याने जगभरातून संताप व्यक्त होत आहे. - Divya Marathi
मॉडेलने धार्मिक स्थळी नग्न फोटोशूट केल्याने जगभरातून संताप व्यक्त होत आहे.

इंटरनॅशनल डेस्क, जेरुसलेम - इस्रायलच्या पवित्र धार्मिक स्थळावर मॉडेलच्या न्यूड फोटोशूटवरून गोंधळ उडाला आहे. बेल्जियमच्या मॉडेल मरिसा पापेन यांनी जेरुसलेममध्ये ज्यूंच्या पवित्र स्थळी वेलिंग वॉलवर नग्न पोज दिल्या. तिने हे फोटोज आपल्या वेबसाइटवर पोस्ट केले आहेत. यावरून जगभरात संताप व्यक्त होत आहे. तथापि, गतवर्षीच मरिसा या मॉडेलला इजिप्तच्या लक्सरमधील प्राचीन मंदिरात नग्न फोटो काढल्याने जेलची हवा खावी लागली होती.

 

धर्मगुरू म्हणाले- हे फोटोशूट लाजिरवाणे
मरिसा पापेन इस्रायलच्या 70व्या वर्धापनानिमित्त 3 दिवसांच्या सहलीवर आली होती. तिने आपल्या वेबसाइटवर ट्रिपचे जे फोटोज पोस्ट केले आहेत, त्यात मृत समुद्रापासून ते फ्लॅगपोलपर्यंतचे फोटोज सामील आहेत. तथापि, मरिसाच्या ज्या फोटोंमुळे गोंधळ माजला आहे, त्यात तिने वेस्टर्न वॉलजवळ नग्न पोज दिलेली होती. वेस्टर्न वॉलचे रब्बी (ज्यू धर्मगुरू) सॅम्युअल राबिनोविच यांनी फोटोशूटची कडक शब्दांत निंदा केली आहे. ते म्हणाले की, ही खूप लाजिरावाणी तसेच गंभीर बाब आहे. यामुळे या जागेचे पावित्र्य तर भंग केलेच, शिवाय येथे येणाऱ्या जगभरातील भाविकांच्या भावनांना ठेच पोहोचवली आहे.

 

असे झाले फोटोशूट..
मरिसाने सांगितले की, जर आम्ही वेलिंग वॉलसमोर फोटोज काढले, तरच आमच्या या सहलीचा उद्देश पूर्ण होणार होता. ट्रिपदरम्यान आमची भेट एका भल्या माणसाशी झाली, त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. त्याने आम्हाला त्याच्या घरी आमंत्रित केले. त्याचे घर वेलिंग वॉलच्या ठीक समोर होते. तेव्हा मरिसा आणि तिचा फोटोग्राफर मॅथियास यांनी त्याला जेव्हा घराच्या छतावर फोटोशूट करण्याची परवानगी मागितली, तेव्हा तो खूप खुश झाला आणि लगेच होकार दिला. यानंतरच हे फोटोशूट करण्यात आले.

 

वादावर काय म्हणतेय मॉडेल?
फोटोग्राफवरून उडालेल्या गोंधळामुळे मरिसाने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, ज्या ईश्वराने शरीराची निर्मिती केली, ते दाखवण्यात अपमान कसा काय होऊ शकतो?

 

काय आहे वेलिंग वॉल (Wailing Wall)?
याला वेस्टर्न वॉलही म्हणतात. हे ज्यू धर्मीयांच्या पवित्र स्थळांपैकी एक आहे. याची निर्मिती ख्रिस्त जन्माआधी किंग हेराल्डने ओल्ड सिटी ऑफ जेरूसलेममध्ये केली होती. ज्यूंच्या पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक 'सेकंड ज्यूइश टेम्पल'च्याच एक्स्टेंशनच्या रूपात याची निर्मिती करण्यात आली होती. ही वॉल तब्बल 488 मीटर लांब आणि 19 मीटर उंच आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, वादग्रस्त Nude Photoshoot बाबत Video व Photos...      

 

 

बातम्या आणखी आहेत...