आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 महिन्यांच्या चिमुरडीचे फुटबॉलएवढे झाले डोके, सर्जरी करून डॉक्टरांनी काढले 6.8 लिटर पाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क, अबोटाबाद - पाकिस्तानात 7 महिन्यांच्या बाळाला एक दुर्मिळ आजार झाला, ज्यामुळे तिचे डोके सुजून 41 इंचांचे झाले. तिच्यासाठी जेवणे- झोपणे कठीण होऊन बसले होते. मुलीच्या पालकांनी नातेवाइकांना व मित्रांना मदत मागितली होती. आता मागच्याच आठवड्यात डॉक्टरांनी तिच्यावर मोफत सर्जरी केली आहे. मुलीचे डोक्यातून 6.8 लिटर फ्लूइड बाहेर काढण्यात आले आहे. आता यापुढे ही मुलगी नॉर्मल आयुष्य जगू शकेल, असा डॉक्टरांना विश्वास आहे.

 

जन्माच्या काळी वेळानेच सुरू झाला होता त्रास
अबोटाबादच्या या मुलीचे नाव आमना नूर आहे. ती हायड्रोसेफॉलस नावाच्या रेअर आजाराने ग्रस्त होती. यामुळे मुलीचे उोके फुटबॉलपेक्षाही जास्त मोठे झाले होते. आमनाची आई म्हणाली की, मुलगी जन्मानंतर काही काळ नॉर्मल होती, परंतु मग तिच्या डोक्याचा आकार अचानक वाढू लागला.

 

सर्जरीनंतर अर्धा झाला डोक्याचा आकार
मुलीवर सर्जरी करणारे डॉ. नजीर भाटी म्हणाले की, आमनाच्या डोक्यातून फ्लूइड काढल्यानंतर डोक्याचा आकार जवळजवळ अर्धा झाला आहे. डॉ. भाटी म्हणाले की, या सर्जरीनंतर आमनाचा प्रतिसाद चांगला राहिला तर लवकरच तिच्यावर दुसरी सर्जरीही करण्यात येईल.

 

पालकांना बरे होण्याची आशा
ट्रांसपोर्ट कंपनीत काम करणारे मुलीचे वडील मलिक अमान महिन्याला फक्त 7 हजार रुपये कमावतात. यामुळे त्यांच्यासाठी मुलीवर उपचार करणे सोपे नव्हते. मलिक म्हणाले की, आम्ही सर्जरीसाठी नातेवाईक आणि मित्रांच्या मदतीने तब्बल दीड लाख रुपये जमा केले होते. परंतु डॉ. भाटी यांनी सर्जरीसाठी कोणतेही चार्जेस घेतले नाहीत. आम्हाला फक्त औषधी, टेस्ट आवश्यक उपकरणांसाठी पैसे द्यावे लागले. आमनाच्या पालकांना आशा आहे की, त्यांची मुलगी नॉर्मल मुलांसारखे आयुष्य जगू शकेल.

 

कसा असतो हा आजार?
डोक्यात जेव्हा गरजेपेक्षा जास्त द्रवपदार्थ तयार होऊ लागतो, तेव्हा तो मेंदूतील छेदांमध्ये जमा व्हायला सुरुवात होते. या कंडिशनला हायड्रोसेफॉलस नावाने ओळखले जाते. यामध्ये जास्त फ्लुइड तयार झाल्याने डोके सुजू लागते आणि यामुळे मेंदूवर दबाव वाढू लागतो.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचा Video व इतर Photos... 

बातम्या आणखी आहेत...