आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Suicide Video: शिक्षकाने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, विद्यार्थिनीने 8व्या मजल्यावरून मारली उडी Public Suicide Of Harassment Victim In China Sparks Online Soul Searching

Suicide Video: शिक्षकाने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, विद्यार्थिनीने 8व्या मजल्यावरून मारली उडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्विंगयांग - चीनमध्ये शिक्षकाच्या लैंगिक शोषणाने त्रस्त झालेल्या 19 वर्षीय तरुणीने उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ही ली नावाची विद्यार्थिनी जेव्हा आत्महत्या करत होती, तेव्हा इमारतीखाली उभे असलेले लोक टाळ्या वाजवत होते. आणि तिच्यावर अभद्र कॉमेंट्स पास करत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्विंगयांग शहरातील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी तिला आत्महत्येसाठी प्रेरित करणाऱ्यांना अटक केली आहे.  

 

शिक्षकाने केला होता चुंबन घेण्याचा प्रयत्न 
- आत्महत्येचा हा व्हिडिओ समोर आला असून यात विद्यार्थिनी 8 मजली इमारतीवरून उडी मारण्यासाठी चढलेली दिसत होती. तर रेस्क्यू टीम तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होती.
- हे दृश्य इमारतीखाली उभे असलेले लोक पाहत होते आणि तरुणीवर अभद्र कॉमेंट्स करत होते. लोक म्हणत होते की, अजूनही उडी का मारली नाहीस? यानंतर विद्यार्थिनीने उडी मारली आणि खाली जमाव मात्र टाळ्या वाजवत होता.
- घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे उपस्थित काही जणांना आत्महत्येसाठी प्रेरित केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. 
- विद्यार्थिनीने तिच्या शिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप केल्याचे सांगण्यात येत आहे. शिक्षकाने तिचे बळजबरी चुंबन घेण्याचा आणि तिच्या अंगचटीला येण्याचा प्रयत्न केला होता. ती मागील काही दिवसांपासून त्याच तणावातून जात होती.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या आत्महत्येचा धक्कादायक Viral Video

 

बातम्या आणखी आहेत...