आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Train सोबत Selfie घेण्याच्या नादात ब्रिजवरून हायटेंशन तारांवर पडली; तरीही वाचली!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को - रशियात 13 वर्षांची मुलगी 13 सेल्फी घेण्याच्या नादात रेल्वे ब्रिजवरून 3000 व्होल्टच्या तारांवर पडली. याच ठिकाणी ती तब्बल 1 तास लटकली होती. तरी ही मुलगी या भीषण अपघातातून जिवंत वाचली आहे. ट्रेन ड्रायव्हर आणि स्थानिकांच्या मदतीने तिला खाली उतरवण्यात आले. तसेच रुग्णालयात तिच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, तिने जमीनीला टच केले नव्हते. त्यामुळेच तिला शॉक बसला नाही. 


नदीवरून येताना आवरला नाही सेल्फीचा मोह
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही टीनेजर आपल्या मित्रांसोबत नदीवर स्वीमिंग करून परत येत होती. त्याचवेळी रेल्वे ब्रिजवरून जाताना तिला मालगाडी दिसून आली. या ट्रेनसोबत सेल्फी घेण्याचा मोह तिला आवरला नाही. सेल्फी घेत असताना ती बेस्ट शॉटसाठी थोडीशी मागे वाकली आणि तिचा तोल गेला. ब्रिजवरून थेट खाली किंवा ट्रेनवर न पडता ती हायटेंशन तारांमध्ये अडकली. याच दरम्यान ट्रेनच्या चालकाने त्या तरुणीला पाहिले होते. त्यानेच रेल्वे लाइनवरील हायटेंशन तारांची वीज बंद केली आणि गावकऱ्यांच्या मदतीने तिला खाली उतरवले. तोपर्यंत ती तासभर त्या तारांवर लटकलेली होती.

बातम्या आणखी आहेत...