आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • तान्हुला दुधासाठी रडत होता, हात पाय नसूनही मोठ्या भावाने केली अशी मदत, Video Viral Toddler With No Hands Or Legs Gives Crying Baby Brother His Dummy

तान्हुला दुधासाठी रडत होता, हात-पाय नसूनही मोठ्या भावाने केली अशी मदत, Video Viral

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क/ टेक्सास - सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जवळपास 3 वर्षांचे एक बाळ आपल्या रडणाऱ्या छोट्या भावाला बेबी टीदर देताना दिसत आहे. सर्वात खास बाब अशी की, मदत करणाऱ्या मोठे भावाला ना हात आहेत, ना पाय. छोट्या भावाला रडताना पाहून त्यालाही पाझर फुटला आणि त्याने कसेबसे बेबी टीदर भावाच्या ओठांना लावले. 

 

कुठला आहे हा व्हिडिओ?
हा व्हिडिओ अमेरिकेच्या टेक्सासचा आहे, जेथे के. टी. हिड्डन नावाच्या महिलेने इन्स्टाग्रामवर 29 ऑगस्ट 2017 रोजी शेअर केले होते. वास्तविक, हा व्हिडिओ केटीचा मुलगा कॅमडीनचा आहे. आनुवंशिक आजार फोकोमिलिया (phocomelia syndrome) मुळे कॅमडीनला जन्मापासूनच हात आणि पाय नाहीत. केटीच्या मते, कॅमडीन नेहमीच अशाप्रकारे मोठ्या भावाचे कर्तव्य पार पाडतो. यावेळी कॅमडीनच्या मोठ्या बहिणीने ते मोबाइलमध्ये शूट केले. केटी म्हणाली- 'या वेळी मी विचार केला की, आमचे मित्र आणि कुटुंबीयांनीही हे पाहावे.'

 

फोकोमिलिया आजार कसा असतो?
हा असा आजार आहे ज्यात काही अवयव जन्मापासूनच नसतात. या आजारामुळे कैमडीनला जन्मापासूनच हात आणि पाय नाहीत. हा आजार प्रेग्नेंसीच्या दरम्यान Thalidomide यासारखी औषधे खाल्ल्याने होतो. Thalidomide औषधाचा वापर बहुतांशपणे कॅन्सरसारख्या आजारांमध्ये होतो. तसे तर हा आजार जेनेटिक प्रॉब्लममुळेही होऊ शकतो. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, हा Viral Video...

 

बातम्या आणखी आहेत...