आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: जेव्हा आपसांत भिडले दोन हेलिकॉप्टर, उडाल्या चिंधळ्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेत दोन पोलिस हेलिकॉप्टरांची दुर्घटना घडली आहे. यात एका हेलिकॉप्टरने लॅन्ड करताना तेथेच थांबलेल्या दुसऱ्या हेलिकॉप्टरला एक धक्का दिला. खाली थांबलेल्या हेलिकॉप्टरचे पंखे सुरूच होते. त्याच बाजूला उतरलेल्या आणि थांबलेल्या चॉपरचे पंखे एकमेकांना भिडले. पाहताक्षणी दोन्ही हेलिकॉप्टरचा चुराळा झाला. कॅलिफोर्नियात घडलेल्या या अपघाताचे वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये कुठल्याही पायलटला गंभीर दुखापत झालेली नाही. 

 

- या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज इंटरनेटवर फिरत आहे. त्यामध्ये एक हेलिकॉप्टर लॅन्ड करताना आणि दुसरे हेलिकॉप्टर टेक ऑफसाठी तयार होत असताना दिसून येतात. 
- कॅलिफोर्नियाच्या पोलिस मुख्यालयाजवळ तैनात असलेले हे चॉपर Bell OH-58 होते. दोन्ही चॉपरचे पंख एकमेकांना भिडल्याने हा अपघात घडला. 
- चॉपरला धडक बसल्याचे पाहताच पायलट त्यातून सुखरूप बाहेर निघाले. त्या दोघांनाही यात किरकोळ जखमा झाल्या आहेत. 

 

पुढील स्लाइडवर पाहा, या दुर्घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...