आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाला ऐकू येत नव्हते, कानात पाहिल्यावर डॉक्टरांनाही बसला धक्का, काढले तब्बल 22 इयरफोन कव्हर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनच्या लिसेस्टरमधून एक चकित करणारा व्हिडिओ समोर आला आहे. येथे एका कानाच्या डॉक्टरांनी व्हिडिओ शेअर करत सांगितले की, एका व्यक्तीच्या कानातून त्यांनी एक-दोन नव्हे, तर तब्बल 22 इयरफोन कव्हर काढले. या व्यक्तीला कमी ऐकू येत होते. ज्यामुळे तो श्रवणयंत्र वापरायचा. जेव्हा तो कानामध्ये मशीन लावायचा, त्यावरचे कव्हर निघून कानातच राहून जायचे. खूप दिवसांपासून त्याला वाटत होते की, इयरफोनचे कव्हर ढिल्ले असल्याने कुठेतरी पडून जात असतील. परंतु जेव्हा त्या कानाने ऐकू येणे पूर्णपणे बंद झाले, तेव्हा तो डॉक्टरांकडे पोहोचला. ईएनटी स्पेशलिस्टने एका कॅमेऱ्याच्या साहाय्याने कानात डोकावून पाहिले, तर त्यांनाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. त्यांनी एक-एक करून तब्बल 22 इयरफोन कव्हर त्या व्यक्तीच्या कानातून बाहेर काढले. या विचित्र घटनेचा व्हिडिओ इयरफोन वापरणाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचा व्हायरल व्हिडिओ...  

बातम्या आणखी आहेत...