आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inspiring: नोकरीच्या पहिल्याच दिवशी 32 किमी चालत गेला कर्मचारी, खुश होऊन कंपनीच्या सीईओने गिफ्ट केली कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेत एका एम्प्लॉईने जॉबच्या पहिल्याच दिवशी असे काही केले की, बॉसने खुश होऊन त्याला कार गिफ्ट केली. वास्तविक, वॉल्टर नावाचा तरुण शिक्षणासोबतच बेलहप्स कंपनीत काम करतो. त्याला ऑफिसच्या पहिल्या दिवशी जॅमी नावाच्या क्लायंटला भेटण्याची असाइनमेंट देण्यात आली. परंतु घरातून निघण्याआधीच त्याची कार बिघडली. यामुळे त्याने पायीच 32 किमी चालत जाऊन क्लाइंटची भेट घेतली. यामुळे खुश होऊन कंपनीच्या सीईओने त्याला स्वत:ची कार गिफ्ट केली. 

 

मध्यरात्रीच निघाला घरातून
वॉल्टर कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. त्याने खर्च भागवण्यासाठी बेलहप्स कंपनी जॉइन केली होती. त्याला पहिल्याच दिवशी जॅमी हेडन नावाच्या क्लायंट भेटण्याचे काम मिळाले. परंतु, एका दिवसापूर्वीच त्याची कार खराब झाली. त्या परिसरातील वादळामुळे दळणवळणाच्या सुविधा बंद होत्या. घरापासून क्लायंटचे अंतर 32 किलोमीटर होते. यामुळे मध्यरात्रीच घरातून पायी निघ्ज्ञून तो कसाबसा क्लायंटपर्यंत पोहोचला. वॉल्टरने जेव्हा आपली कहाणी सांगितली तेव्हा जॅमी एवढा प्रभावित झाला की, फेसबुकवर वॉल्टरची कहाणी लिहून त्यापासून प्रेरणा घेण्याची पोस्ट लिहिली.
कंपनीचे सीईओ ल्यूक मार्कलिन यांनी आपल्या कर्मचाऱ्याच्या या समर्पणाबाबत ऐकले तेव्हा ते एवढे प्रभावित झाले की, त्यांनी त्याला कामाच्या पहिल्याच दिवशी आपली कार गिफ्ट केली.

 

पोलिसांनी खाऊ घातला नाष्टा
जेव्हा वॉल्टर रस्त्याने जात होता तेव्हा पेलहममध्ये पहाटे 4 वाजता एक पोलिस अधिकारी मार्क नाइटन यांनी त्याला एकट्याने जाताना हटकले. त्याची विचारपूस केल्यावर वॉल्टरने सांगितले की, तो कामासाठी जात आहे. यानंतर त्याने पूर्ण कहाणी सांगितली. त्याच्या कामामुळे इम्प्रेस होऊन त्या पोलिसानेच त्याला नाष्टा खाऊ घातला.

 

कहाणीपासून प्रेरणा घेताहेत लोक
या कहाणीला वॉल्टरच्या क्लाइंट जॅमी यांनी फेसबुकवर शेअर केले, यानंतर अनेक जण वॉल्टरची कहाणी वाचून प्रेरणा घेत आहेत. काहींनी लिहिली की, वॉल्टरप्रमाणेच मेहनत आणि जिद्द असली पाहिजे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचा Video व Photos... 

 

 

बातम्या आणखी आहेत...