आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही दृश्ये तुम्हाला विचलित करू शकतात.. हेलिकॉप्टरच्या पात्याने झाले त्याचे तुकडे-तुकडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलंबियामध्ये एक अत्यंत वेदनादायी असा अपघात घडल्याचे समोर आले आहे. याठिकाणी एका एका इंजिनीअरचा त्याच्याच टीमच्या हेलिकॉप्टरने कापल्या गेल्याने मृत्यू झाला. हेलिकॉप्टरचे मेंटनन्स पाहणारा इव्हान आंद्रेज कोलंबियाच्या एका डोंगराळ परिसरात दुसऱ्या एका अपघातग्रस्त हेलिकॉप्टरच्या मदतीसाठी गेला होता. पण परतताना हेलिकॉप्टरमध्ये चढताना हा दुर्दैवी अपघात झाला. 


कोलंबियाच्या डोंगराळ बागात एक मिनी हेलिकॉप्टर इलेक्ट्रिक फेल्युअपमुळे क्रॅश झाले होते. त्या हेलिकॉप्टरच्या मदतीसाठी ही टीम याठिकाणी पोहोचली होती. इव्हान (पांढरा शर्ट) आधी क्रॅश झालेले हेलिकॉप्टर पाहण्यासाठी खाली उतरला होता. त्याचदरम्यान पायलेट जुआन कार्लोसने हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे टीमला वर चढता येईल असे त्याला वाटले. पण अचानक त्याचे संतुलन बिघडले आणि हेलिकॉप्टर डावीकडे झुकले गेले. त्यामुळे दुसरीकडे उभा असलेल्या इंजीनीअर इव्हानचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले. तर क्रॅशनंतर पायलट जुआनदेखिल गंभीररित्या जखमी झाला होता. 


पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...