आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठीत खुपसले 6 फुट लांब भाले, तरी स्वतःहून चालत आला रुग्णालयात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - ही छायाचित्रे चीनच्या अनहुई प्रांतातील एका रुग्णालयाची आहेत. यात लाल जॅकेटमध्ये पालथा झोपलेला व्यक्ती पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. त्याच्या पाठीत 6 फूटचे भाले खुपसलेले होते. चिनी माध्यमांचा दाखला देत द सनने दिलेल्या वृत्तानुसार, तो उपचारासाठी डॉक्टरांची वाट पाहत होता.

 

> पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने डॉक्टरांना आपल्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती दिली. तसेच तो स्वतःहून उपचारासाठी चालून रुग्णालयात गेला.
> त्याची अवस्था पाहून डॉक्टर देखील घाबरले. त्यांनी त्या व्यक्तीवर उपचार करण्यास नकार दिला. पाठीतील भाले काढताच रक्तस्रावाने त्याचा मृत्यू होईल अशी भिती डॉक्टरांना होती.
> पोलिसांच्या आग्रहास्तव त्यांनी केवळ त्याच्या पाठीत खुपसलेला भाला तसाच कापून छोटा केला आणि दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले. 
> दुसऱ्या रुग्णालयात त्याच्या पाठीतील भाला काढून उपचार करण्यात आले. तसेच काही दिवस रुग्णालयात ठेवून त्याला सुट्टी देणार असे डॉक्टरांनी सांगितले आहे. याबाबत पोलिस सविस्तर तपास करत आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...