आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणमध्ये 17 वर्षात प्रथमच ईद निमित्त दहशतवाद्यांचा संघर्षविराम, सरकारचा पुढाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तालिबान्यांनी सरकारचा सात दिवसांचा प्रस्ताव धुडकावला. - Divya Marathi
तालिबान्यांनी सरकारचा सात दिवसांचा प्रस्ताव धुडकावला.

काबूल - अफगाणिस्तानमधील दहशतवादी संघटना तालिबानने ईदच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेला संघर्षविरामचा प्रस्ताव मान्य केला आहे. राष्ट्रपती अब्दुल गनी यांनी सात दिवसांचा प्रस्ताव दिला होता, मात्र दहशतवाद्यांनी फक्त तीन दिवसांचा संघर्षविराम मान्य केला आहे. 2001 मध्ये अमेरिकेसोबत संघर्ष संघर्ष सुरु झाल्यानंतर तालिबान्यांनी सैन्यासोबत असा करार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. वास्तविक सैन्याने म्हटले आहे की या दरम्यान जर हल्ला झाला किंवा युद्ध छेडले गेले तर ते चोख प्रत्युत्तर देतील. याशिवाय दहशतवाद्यांनी म्हटले आहे की विदेशी सैनिकांसोबतची कारवाई सुरुच राहिल. 

 

पत्रकारांना व्हॉट्सअॅप मेसेज 
- तालिबानने या संबंधीचा एक मेसेज अफगाणिस्तानच्या सर्व पत्रकारांना पाठवला आहे. त्यामध्ये म्हटले आहे, की मुजाहिद्दीनांना निर्देश आहे की त्यांनी ईदच्या आधी तीन दिवस अफगाणी सैन्यावर हल्ला करु नये.
- त्यासोबतच या पत्रात पुढे म्हटले आहे की मुजाहिदीनांवर हल्ला झाला तर आम्ही आमचे संरक्षण करण्यास तयार आहोत. 
- तसेच विदेशी सैनिकांबद्दल म्हटले आहे, की त्यांचा या संघर्षविराममध्ये समावेश नाही. म्हणजेच, अफगाणी सैन्याशिवाय इतर कोणत्याही देशाच्या सैनिकांवर हल्ला होऊ शकतो. 

अफगाण सरकारने घेतला पुढाकार 
- अफगाण सरकारने दोन दिवसांपूर्वीच (गुरुवार) तालिबान्यांविरोधात संघर्षविरामची घोषणा केली होती. राष्ट्रपती गनी यांनी ट्विट करुन तारखाही जाहीर केल्या होत्या. 

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर धर्मगुरु देखील 
- या महिन्यात उलेमांनी आत्मघाती हल्ले हे इस्लाम विरोधी असल्याचा फतवा काढला होता. दहशतवाद्यांनी त्याच्या एक तासानंतरच राजधानी काबूलमध्ये आत्मघातकी हल्ला केला होता. त्यात 7 उलेमा ठार झाले होते. या नंतर म्हटले गेले होते, की दहशतवादी त्यांच्या विरोधातील फतव्याने नाराज होते. 

 

अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ले वाढले 
- गेल्या महिन्यात 9 मे रोजी काबूल पोलिस स्टेशनवर काही बंदुकधारींनी आत्मघाती हल्ला केला होता. यात 5 जणांचा मृत्यू झाला होता. तर 20 हून अधिक लोक जखमी झाले होते. 
- हक्कानी नेटवर्क आणि लष्कर-ए-तोएबाने हे हल्ले घडवून आणले होते. 
- अफगाणमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हल्ले वाढले आहेत. 6 मे रोजी एका मशिदीत तयार करण्यात आलेल्या व्होटर रजिस्ट्रेशन सेंटरवर हल्ला झाला होता. त्यात 15 जणांचा बळी गेला होता. 

बातम्या आणखी आहेत...