आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्योंगयांग - अण्वस्त्र कार्यक्रमाला वाढवण्याचा हट्ट सोडून अमेरिकेशी चर्चेसाठी तयार झालेल्या उत्तर कोरियामध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. गुरुवारी हुकूमशहा किम जोंग ऊनने आपली पत्नी री सोल जू यांना फर्स्ट लेडी घोषित केले. उत्तर कोरियात 40 वर्षांनंतर हा सन्मान झालेला पाहायला मिळाला. वास्तविक, पत्नीचे स्टेटस वाढवण्यामागे किमचा उद्देश अमेरिकी राष्ट्राध्यक्षासोबत होणारी शिखर वार्ता आहे. मे महिन्यात जेव्हा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसोबत किम बसतील तेव्हा ते ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया यांच्याप्रमाणेच आपल्या पत्नीला बरोबरीचा दर्जा देऊ इच्छितात.
री काही दिवसांपूर्वी दिसल्या होत्या किमसोबत
- री सोल जू नुकत्याच किमसोबत अनेक ऑफिशियल इव्हेंटमध्ये सहभागी झाल्या, परंतु त्या पहिल्यांदा सार्वजनिकरीत्या मागच्या आठवड्याच्या अखेरीस चिनी कलाकारांद्वारे प्रस्तुत बॅले परफॉर्मन्समध्ये दिसल्या होत्या. मीडियाने त्यांच्या या सक्रियतेनंतर त्यांना 'रिस्पेक्टेड फर्स्ट लेडी' असे नाव दिले होते.
यापूर्वी 1974 मध्ये किम सोंग यांना मिळाला होता हा सन्मान
- देशाच्या इतिहासात तब्बल 40 वर्षांनंतर हा सम्मान पाहायला मिळत आहे. यापूर्वी फर्स्ट लेडीचे टायटल देशाचा नेत्याच्या पत्नीसाठी वापरले जात होते. 1974 मध्ये हा स्टेटस उत्तर कोरियाचे संस्थापक किम द्वितीय संग यांची दुसरी पत्नी किम सोंग यांना मिळाला होता.
देशासाठी चिअरलीडरही बनली होती किमची पत्नी
- आतापर्यंत री यांना उत्तर कोरियात कॉम्रेड म्हणून ओळखले जायचे. उत्तर कोरियाच्या वरिष्ठ स्टार महिला अँकर रि चुन ही यांनी फर्स्ट लेडीबाबत सांगितले होते. 2012 पर्यंत री सोल गायनाशी जोडलेल्या होत्या. 2005 मध्ये दक्षिण कोरियात आयोजित एका इंटरनॅशनल स्पोर्ट इव्हेंटमध्ये आपल्या देशासाठी त्यांनी एक चिअरलीडर म्हणून काम केले होते.
किमची आई वारल्यावर सक्रिय झाल्या री
- असे म्हटले जाते की, 3 मुलांची आई असलेल्या 29 वर्षीय री सोल या हायप्रोफाइल महिलेच्या रूपात प्रसिद्ध आहेत. त्या फॅशनबाबतही खूप जागरूक आहेत आणि नेहमी लक्झरी आऊटफिटमध्ये दिसतात. काही विशेषज्ञांचे मानणे आहे की, किम यांची आई योंग ही यांच्या निधनानंतर री यांची सार्वजनिक सक्रियता वाढली आहे. किमच्या आईचा मृत्यू कॅन्सरमुळे 2004 मध्ये झाला होता.
स्वत:ला सामान्य देश म्हणून सादर करत आहे उत्तर कोरिया
- विशेषज्ञ मानतात की, री यांना फर्स्ट लेडीचा दर्जा देण्याचा अर्थ म्हणजे उत्तर कोरियाला इतर देशांप्रमाणेच सामान्य देश म्हणून सादर करणे आहे. पुढच्या शुक्रवारी किम दक्षिण कोरियायी राष्ट्रपती मून-जे-इन यांची भेट घेतील. यानंतर अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना भेटतील. यामुळे किम री यांना प्रमोट करू इच्छितात. मागच्या आठवड्यात री आणि किम सार्वजनिकरीत्या एकत्र दिसले.
पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.