आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्धबंदीचे उल्लंघन केल्यास अमेरिकेचा सिरियाला कडक कारवाईचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - युद्धबंदीचे उल्लंघन केल्यास सिरियाविरोधात कडक पावले उचलली जातील, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. युद्धबंदी असलेल्या दक्षिण-पश्चिम क्षेत्रात लष्करी मोहीम सुरू करण्यात आल्याचे वृत्त येताच अमेरिकेने ही भूमिका स्पष्ट केली आहे.  


अमेरिकेने युद्ध क्षेत्राचा विस्तार करताना सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांनाही धमकी दिली आहे. परराष्ट्र   विभागाचे प्रवक्ते हिथर नॉअर्ट म्हणाले, सिरिया प्रदेशात हिंसाचार वाढणार नाही यासाठी अमेरिकेने रशिया व जॉर्डनसोबत प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे असद सरकारने युद्धबंदीचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरोधात कडक पावले उचलणार आहे.  


युद्धाचे निरीक्षण करणारी ब्रिटनची मानवी हक्क संघटना सिरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राइट्सने बुधवारी जाहीर केलेल्या अहवालात िसरियन सैनिक दक्षिणेकडील भागात कूच करत असल्याचा दावा केला होता. त्यानंतर अमेरिकेने सिरियाला इशारा दिला आहे.  सरकारी लढाऊ विमानांनी डेरामध्ये बंडखोरांच्या ताब्यातील प्रदेशात काही पत्रके टाकली आहेत.

 

त्यात लढवय्यांनी शस्त्रसंधी स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सिरिया डेमोक्रॅटिक फोर्सेसच्या ताब्यातील हा प्रदेश आहे. या दलाच्या विरोधात असद सरकारने लष्करी कारवाई सुरू केली आहे. अलीकडेच झालेल्या कारवाईच्या अनेक आठवड्यांनंतर अमेरिकेने ही भूमिका मांडली आहे.

बातम्या आणखी आहेत...