आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: श्रीलंकेत मुस्लिमविरोधी हिंसाचार, हा कट्टरपंथी मास्टरमाइंड असल्याचे आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - श्रीलंकेत हिंसाचाराचे लोण इतके पसरले की सरकारला मंगळवारपासून देशभरात 10 दिवसांची आणीबाणी लागू करावी लागली आहे. श्रीलंकेत 10 टक्के लोकसंख्या असलेल्या अल्पसंख्याक मुस्लिमविरोधी हिंसाचाराचे आरोप कट्टरपंथी नेत्यावर लागत आहेत. 

 

कोण आहे तो कट्टरपंथी नेता?
श्रीलंकेतील कट्टर राष्ट्रवादी बौद्ध संघटना बोदू बाला सेना (बीबीएस) चा प्रमुख गालागोदा अत्थे ननसारा यानेच हिंसाचार भडकवल्याचे आरोप होत आहेत. अनेक व्हिडिओ आणि मुलाखतींमध्ये त्याने आपल्या समर्थकांना मुस्लिम अल्पसंख्याक श्रीलंकेसाठी धोका असल्याचा प्रचार केला. इंग्रजी साप्ताहिक आउटलुकला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने श्रीलंकेतील सर्वच कट्टर राष्ट्रवादी नेते आणि कार्यकर्त्यांना अल्पसंख्याकांविरोधात एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे. श्रीलंकेतील मुस्लिम अल्पसंख्याक हे देशाच्या शांततेला धोका असल्याचे त्याने सांगितले आहे. देशभर उसळलेल्या मुस्लिम विरोधी हिंसाचारासाठी तोच मास्टरमाइंड असल्याचे सांगितले जात आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या हिंसाचाराचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...