आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमालियात राष्ट्रपती भवनाजवळ बॉम्बस्फोट; 18 ठार, 20 जखमी, अल शबाबने स्वीकारली जबाबदारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोगादिशू- सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये दोन कारमध्ये बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 18 जण जागेवरच ठार झाले असून 20 जण जखमी झाल्याचे कळते.  जखमींपैकी अनेक जण गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मोगादिशूमध्ये स्थित राष्ट्रपती भवनाजवळ आणि एका हॉटेलसमोर दोन कारमध्ये बॉम्बस्फोट झाले, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी वृत्तसंस्थेला दिली. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

 

यापूर्वीही झाला होता हल्ला...

स्फोटातील जखमींना रुग्णवाहिकांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तथापि, सरकारने यापूर्वीच दहशतवादी घातपाताचा इशारा दिला होता. हा इशारा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी हे दोन स्फोट झाले. अल-शबाब या दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. अल-शबाब ही अल कायदाशी संबंधित दहशतवादी संघटना आहे. डिसेंबर 2017 मध्येही या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात 18 पोलिसांचा मृत्यू झाला होता.

मोगादिशूमध्ये गतवर्षी ऑक्टोबरमध्ये ट्रकमध्ये बॉम्ब लावून स्फोट घडवण्यात आला होता. यात 512 जणांचा मृत्यू झाला होता. सोमालियाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा हल्ला होता. या हल्ल्यामागेही अल-शबाब ही दहशतवादी संघटना होती, असे तेव्हा सरकारने स्पष्ट केले होते. पुन्हा याच दहशतवादी संघटनेने सोमालियाच्या राजधानीत हल्ला घडवला आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...