आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अझरबैजानच्या व्यसनमुक्ती केंद्राला भीषण आग, 24 जणांचा मृत्यू; 3 जण गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाकू - येथील ड्रग्स रिहॅबिलिटेशन सेंटरला (व्यसनमुक्ती केंद्र) शुक्रवारी अचानक भीषण आग लागली. या आगीत किमान 24 जणांचा मृत्यू झाला असून इतर 3 जण गंभीर जखमी आहेत. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी बचावकार्य सुरू असून 31 जणांना यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सुरुवातीला मृतांची संख्या 30 झाल्याचे सांगण्यात आले होते. पण, अधिकाऱ्यांनी आकडेवारी 24 असल्याचे सांगितले आहे. आग इतकी भीषण होती, की अक्षरशः फुटलेल्या खिडक्यांमधून भडका दिसून येत होता. 

 

- ही दुर्घटना घडली त्यावेळी इमारतीमध्ये 55 लोक होते. त्यापैकी 31 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. 
- आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे, बचाव कार्य करत असतानाच 24 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. तसेच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
- आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर ब्रिगेडचे 10 बंब पाठवण्यात आले होते. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, तेथील वेळेनुसार, सकाळी 6 च्या सुमारास ही आग लागली. आगीच्या कारणाचा अद्याप पत्ता लागलेला नाही. 

बातम्या आणखी आहेत...