आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 वर्षांपूर्वीच झाली होती भविष्यवाणी, पुतिन गाजवणार जगावर अधिराज्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदी व्लादिमीर पुतिन यांची चौथ्यांदा निवड झाली आहे. ते जोसेफ स्टॅलिन यांच्यानंतर सर्वाधिक काळ रशियावर सत्ता गाजवणारे नेते ठरले आहेत. केवळ रशियातच नव्हे, तर जगभरात पुतिन यांची ताकद वाढले आणि ते जगावर अधिराज्य गाजवतील अशी भविष्यवाणी 40 वर्षांपूर्वी बाबा वांगा यांनी केली होती. जगातील सर्वात लोकप्रीय भविष्यवेदतांपैकी एक बाबा वांगा या महिलेच्या 2018 बद्दल केलेल्या दोन भविष्यवाणी देखील समोर आल्या आहेत. 

 

काय होती भविष्यवाणी..?
बर्मिंघम मेलने यासंदर्भातील एक वृत्त दिले आहे. त्यानुसार, बाबा वांगाची भविष्यवाणी होती, की "व्लादिमीर वगळता सर्व काही नष्ट होईल. रशिया आणि पुतिन यांचे वैभव जग पाहणार आहे. त्यांच्यासमोर कुणीच टिकू शकणार नाही. त्यांच्या वाटेत कुणीही येऊ शकणार नाही. ते जगावर अधिराज्य गाजवतील." पुतिन 2000 मध्ये सत्तेवर आले. गेल्या 18 वर्षांपासून त्यांना कुणीही पराभूत करू शकलेले नाही. 

 

कोण आहे बाबा वांगा..?
11 सप्टेंबर 2001 (9/11) च्या हल्ल्याचे भाकित सुद्धा याच महिलेने वर्तवले होते. अमेरिकेच्या टॉवरवर दोन स्टीलचे पक्षी धडकतील असे ती म्हणाली होती. तिने वर्तवलेले आयसिस आणि ब्रेक्झिटचेही भाकितही तंतोतंत खरे ठरले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, या महिलेचा मृत्यू 1996 मध्ये झाला. त्यावेळी ती 85 वर्षांची होती. या महिलेला डोळे नव्हते. तरीही तिच्याकडे दिव्यदृष्टी होती असे तिच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची मान्यता आहे. तिच्यावर विश्वास नाही करणारे लोक हे निव्वळ संयोग मानतात.

 

2018 मध्ये घडणार या 2 गोष्टी
> बाल्कन्सच्या बाबा वांगा यांना मानणाऱ्यांचा वर्ग खूप मोठा आहे. त्यांनी केलेल्या भविष्यवाणी आतापर्यंत चुकलेली नाही असे जाणकार सांगतात. मृत्यूपूर्वीच तिने पृथ्वी नष्ट होईपर्यंतची सर्वच भाकिते वर्तवली आहेत.
> 2018 साठी या महिलेने दोन भाकित वर्तवले होते. त्यापैकीच एक म्हणजे, चीन अमेरिकेला मागे टाकून जागतिक महासत्ता होणार आहे. आर्थिक आणि संरक्षण अशा सर्वच बाबतीत चीन अमेरिकेला सुद्धा वरचढ ठरून सर्वात बलाढ्य देश होईल.
> 2018 मध्येच अंतराळ संशोधनात आणखी एक क्रांती घडून येईल. माणसाला पुढच्या वर्षी एका नव्याच प्रकारच्या ऊर्जेचा शोध लागणार आहे. ही ऊर्जा संशोधकांना शुक्र ग्रहावर सापडणार आहे असे दुसरे भाकित तिने 2018 बद्दल वर्तवले आहे.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, बाबा वांगाने आतापर्यंत केलेल्या भविष्यवाणी, वर्तवला जगाचा अंत...

बातम्या आणखी आहेत...