आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काठमांडू विमानतळावर बांगलादेशाचे विमान कोसळले, 49 ठार, 22 जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काठमांडू-  नेपाळची राजधानी काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी बांगलादेशाचे विमान लँडिंगदरम्यान कोसळले. यात ४९ प्रवाशांचा मृत्यू तर २२ जण जखमी झाले. ढाक्याहून आलेल्या या विमानाला दुपारी २.२० वाजता हा अपघात घडला. एअर ट्रॅफिक कंट्रोलने (एटीसी) वैमानिकाला रनवे क्रमांक २ म्हणजेच विमानतळाच्या दक्षिणेकडून लँड करण्यास सांगितले. मात्र वैमानिकाने रनवे-२० वर (उत्तरेकडून) विमान उतरवले. यामुळे विमान घसरून जवळच्या फुटबॉल मैदानात आदळले व त्याचा स्फाेट हाेऊन अाग लागली. विमानतळाचे प्रवक्ते म्हणाले, क्रॅश होताच विमान २ भागांत तुटले. प्रवाशांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडले.

बातम्या आणखी आहेत...