आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US : पाकला मदत नाकारणारे बिल सादर, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांशी संबंध नाही-खासदार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जानेवारीमध्ये अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारी 255 अब्ज डॉलर (सुमारे 1626 कोटी रुपये) ची लष्करी मदत थांबवली होती. - Divya Marathi
जानेवारीमध्ये अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारी 255 अब्ज डॉलर (सुमारे 1626 कोटी रुपये) ची लष्करी मदत थांबवली होती.

वॉशिंग्टन - अमेरिकन काँग्रेसमध्ये पाकिस्तानला बिगर सरकारी मदत न देण्याचे बिल सादर करण्यात आले आहे. जो देश दहशतवाद्यांना आश्रय देतो, त्यांना लष्करी मदत पुरवतो त्या देशाला मदत करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे बिल सादर करणारे खासदार म्हणाले. पाकला दिल्या जाणाऱ्या मदतीचा पैसा आता अमेरिकेच्या विकासासाठी वापरला जाईल असेही म्हटले गेले. 


अमेरिकेच्या सरकारचाच विरोध 
- न्यूज एजन्सीच्या मते बिल साऊथ कॅरोलिनाचे खासदार मार्क स्टेनफोर्ड आणि केंटुकीचे खासदार थॉमस मॅसी यांनी सादर केले. 
- हे बिल अमेरिकेचे परराष्ट्र खाते आणि युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (USAID) ला अमेरिकेच्या टॅक्सपेयर्सचा पैसा पाकिस्तानला पाठवण्याचा विरोध करेल. 
- या निधीचा वापर अमेरिकेत रस्ते तयार करण्यासाठी होईल. 
- 9/11 च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला 34 अब्ज डॉलर (सुमारे 2 लाख 31 हजार कोटी रुपये) ची मदत दिली आहे. त्यात 2017 मध्ये 526 मिलियन डॉलर (3382 कोटी रुपये) दिले. 


पाकचे सत्य जगाला माहिती 
- पाकिस्तान केवळ दहशतवाद्यांना आश्रयच देतो असे नाही तर त्यांना सुविधाही उपलब्ध करून देतो हे संपूर्ण जगाला माहिती असल्याचे दोन्ही खासदार म्हणाले. 
- 2 जानेवारीला अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारी 255 मिलियन डॉलर (1626 कोटी रुपये) ची लष्करी मदत थांबवली होती. 

 

 

बातम्या आणखी आहेत...