आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्‍लू फिल्‍म अॅक्ट्रेसने ठोकला ट्रम्प विरोधात खटला, 84 लाख घेऊन पोलखोलसाठी तयार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजेलिस - अमेरिका फर्स्टच्या घोषणा देत राष्ट्राध्यक्ष पदी निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प सलग कुठल्या ना कुठल्या वादात अडकत आहेत. मेक्सिकोची भिंत, परदेशी मुस्लिमांना प्रवेश बंदी, रशियासोबत छुपे संबंध, औद्योगिक कायद्यांमध्ये बदल आणि आता पॉर्न स्टारशी कथित संबंध अशा आरोपांनी ट्रम्प यांना घेरले आहे.  

 

पॉर्न स्टारशी जुन्या संबंधांच्या चर्चा आतापर्यंत बंद दरवाज्यांत ऐकायला येत होत्या. आता मात्र, हा वाद चक्क न्यायालयात पोहोचला आहे. अॅडल्ट चित्रपटांतील अभिनेत्रीने ट्रम्प यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. आपण कथितरीत्या ट्रम्प यांच्यासोबत केलेला करार रद्द करण्यात यावा अशी मागणी ती या खटल्यात करत आहे. हा करार एक गुप्त स्वरुपाचा करार होता. त्यामध्ये ठराविक रक्कम घेऊन ट्रम्प यांचे छुपे कारनामे मी लोकांना सांगणार नाही असे तिने स्वाक्षरीसह लिहून दिले होते. 

 

पुढे वाचा, नेमका काय होता तो गुप्त करार...

बातम्या आणखी आहेत...