आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: भारताच्या शांती सैन्याने विक्रमी वेळेत सुदानमध्ये उभारला पूल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्ट्र- भारताच्या शांती सैनिकांच्या कर्तृत्वाची बातमी संक्रांतीच्या सणाला आणखी गोड करणारी ठरली आहे. मुसळधार पावसात वाहून गेलेला पूल विक्रमी वेळेत पूर्ववत झाल्याने पूर्व-मध्य आफ्रिकेतील दक्षिण सुदानमधील अकोका गावातील लोक भारतीय सैनिकांना धन्यवाद देत आहेत. कारण उर्वरित प्रदेश आणि गावाच्या मधून नदी जाते. त्याच नदीवर हा पूल आहे. हा पूल सुरू झाल्याने गावकऱ्यांची दैनंदिन कामे सुरळीत झाली आहेत.  


गेल्या वर्षी जूनमध्ये गावाला जोडणारा हा पूल कोसळला होता. संपर्क तुटल्याने अनेक महिन्यांपासून गावकऱ्यांची सगळीच कामे खोळंबली होती. उदरनिर्वाहाचेदेखील प्रश्न निर्माण झाले होते. परंतु हा पूल बांधण्याचे आव्हान भारतीय शांती सैनिकांनी लीलया पूर्ण करून गावकऱ्यांना सुखद धक्का दिला. आता या भागातील आणखी काही रस्त्यांचे बांधकाम करण्याची मोहीमही भारतीय शांती सैन्याकडे सोपवली जाणार आहे. पुलामुळे अकोका गावातील लोकांना जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता होऊ लागली आहे, अशी माहिती मोहिमेचे प्रवक्ते राटोमीर पेट्रोविक यांनी दिली. भारताच्या शांती सैन्याने जगभरात नेहमीच मोठे योगदान दिले आहे. 


दहा दिवसांत काम फत्ते  
अकोका गावाला जोडणाऱ्या नदीवरील पुलाची लांबी ३०० मीटर होती. पावसात पडझड झालेल्या पुलाला सुस्थितीत आणण्याचे आव्हान भारतीय सैनिकांनी हाती घेतले. त्यानंतर केवळ दहा दिवसांतच भारतीय सैनिकांनी हा पूल उभा करून दाखवला. 


कौतुकाची थाप  
भारतीय शांती सैनिकांनी दक्षिण सुदानमधील अकोका गावकऱ्यांसाठी पूल तातडीने उभा करून मानवतेची सेवा केली आहे. अत्यंत वेगाने पूर्ण करण्याचा हा विक्रम आहे, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्राने सैनिकांच्या मोहिमेचे कौतुक केले आहे.  


पाण्याचे मोठे आव्हान होते  
अकोका गावाच्या पुलाची मोहीम पूर्ण झाली. परंतु खरे आव्हान पुलाचा मोठा भाग चार मीटरपर्यंत पाण्यात होता. हेच आमच्यासाठी आव्हान होते. ते लक्षात घेऊन बांधकाम करण्यात आले. त्यात चांगले यश आले.  
-लेफ्टनंट कर्नल निष्काम पुरी, प्रमुख, भारतीय अभियांत्रिकी कंपनी.

बातम्या आणखी आहेत...