आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देहविक्रयाची कमाई खात आहेत गुगल-फेसबूक; ब्रिटिश रिपोर्टचा खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनची राष्ट्रीय गुन्हेगारी तपास संस्था (NCA) ने फेसबूक आणि गुगलवर वेश्यावृत्तीतून कमाई करण्याचे आरोप लावले आहेत. जगातील सर्वात मोठ्या या दोन्ही कंपन्या वेश्यावृत्ती आणि देहविक्रयासह कॉलगर्ल्सला प्रोमोट करत आहेत. ब्रिटनमध्ये असा प्रकार सर्रास सुरू आहे. विविध देशांतून ब्रिटनमध्ये आलेल्या महिलांच्या शोषणात फेसबूक आणि गुगल सुद्धा सहभागी आहेत असा आरोप लावण्यात आला आहे. 
 
सरकार कायदा करण्याच्या विचारात
इंटरनेटवर सध्या खुलेआम वेश्यावृत्ती आणि सेक्सचा व्यापार सुरू आहे. अनेक देशांमध्ये हा चिंतेचा विषय ठरला आहे. त्यापैकीच एक देश ब्रिटनने आता यावर कायदा करण्यासाठी विचार सुरू केला आहे. प्रस्तावित कायद्यानुसार, इंटरनेटवर वेश्यावृत्तीला प्रोत्साहन देणारा कन्टेंट सापडल्यास त्यासाठी वेबसाइट जबाबदार धरले जातील. केवळ ब्रिटनच नव्हे, तर अमेरिका सुद्धा अशा प्रकारच्या कायद्यांवर विचार करत आहे. इंटरनेटवरून होणारी मानव तस्करी थांबावी असा या मागचा हेतू आहे.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, असा झाला खुलासा आणि फेसबूकची प्रतिक्रिया...

बातम्या आणखी आहेत...