आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • British Tourist Arrested In Thailand After Thai Prostitute Fell From Balcony In An Adventurous Stunt

पाचव्या मजल्यावरील बाल्कनीत करत होते ते काम, मग झाले असे काही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडित तरुणी आणि आरोपी रीस... - Divya Marathi
पीडित तरुणी आणि आरोपी रीस...

इंटरनॅशनल डेस्क - थायलंडच्या एका बारमधून 25 वर्षीय ब्रिटिश नागरिकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थायलंडच्या पट्टाया येथील एका हॉटेलात तो प्रॉस्टिट्युटसोबत थांबला होता. हे दोघे हॉटेलच्या पाचव्या मजल्यावरील बाल्कनीत सेक्स करत होते. त्याचवेळी 26 वर्षीय कॉलगर्ल बाल्कनीतून खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला. 

 

अशी झाली अटक
- पट्टाया येथील एका हॉटेलात शनिवारी भल्या पहाटेच्या सुमारास पर्यटक आणि हॉटेल स्टाफला जमीनीवर काहीतरी आदळल्याचा आवाज आला. 
- बाहेर येऊन पाहिले तेव्हा एक तरुणी खाली पडलेली होती. तसेच एकही कपडा नसलेल्या तिच्या शरीराभोवती फक्त रक्तच-रक्त होते. 
- हॉटेल स्टाफने वेळीच पोलिस आणि डॉक्टरांना घटनास्थळी बोलावले. पण, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला. 
- पोलिसांनी संशयित खोल्यांची चौकशी केली असता त्यांना ब्रिटिश टुरिस्ट रीस वेला यावर संशय आला. 
- घटना घडताच तो रुममधून पसार झाला होता. काही अंतरावरच एका बारमधून त्याला अटक करण्यात आली. 

 

काहीच पश्चाताप नाही...
पोलिसांनी रीसला अटक केली तेव्हा तो अक्षरशः हसत होता. त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप मुळीच दिसत नव्हता. पोलिसांसमोर त्याने आपण बाल्कनीत अॅडव्हेंजरस कृत्य करत होतो अशी कबुली दिली. अटक करतानाही तो हसत-हसत पोलिसांकडून सिगारेट मिळेल का? असे विचारत होता. 

 

3 हजारांत अब्रूचा सौदा...
पीडित तरुणीचे नाव वनीपा उर्फ जॉय असे होते. थायलंडच्या दुसऱ्या एका प्रांतातून ती पैसा कमवण्यासाठी पट्टायाच्या कुप्रसिद्ध गल्ल्यांमध्ये वसली होती. याच रस्त्यावर शेकडो प्रॉस्टिट्युट आणि कॉलगर्ल फिरत असतात. थायलंडला येणारे अनेक परदेशी पर्यटक मसाज पार्लर आणि वेश्यांसाठी याच ठिकाणी येतात. या परिसरातूनच रीसने वनीपाला 3 हजार रुपये देऊन हॉटेलात आणले होते. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, वनीपा, रीस आणि घटनास्थळाचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...