आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • धक्कादायक: 'प्लेअरकडून प्रेग्नंट व्हा अन् आयुष्यभर फ्री जेवण मिळवा', बर्गर कंपनीची वादग्रस्त जाहिरात Burger King Apologizes For Russian World Cup Pregnancy Ad

धक्कादायक: 'प्लेअरकडून प्रेग्नंट व्हा अन् आयुष्यभर फ्री जेवण मिळवा', बर्गर कंपनीची वादग्रस्त जाहिरात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - प्रसिद्ध अमेरिकी फूड चेन बर्गर किंगने एक अतिशय संतापजनक जाहिरात केली आहे. त्यावर आता कंपनीला माफीही मागावी लागली आहे. रशियात सध्या फुटबॉल वर्ल्ड कप सुरू आहे. तेथे बर्गर किंगने ऑफर दिली की, जर एखादी तरुणी वर्ल्ड कपमध्ये खेळत असलेल्या एखाद्या फुटबॉलपटूपासून प्रेग्नंट झाली, तर तिला 3 मिलियन रुबल (रशियन चलन) म्हणजेच जवळपास 32 लाख रुपये दिले जातील. शिवाय त्यांना आयुष्यभरासाठी बर्गर किंगमध्ये फुकट जेवणही मिळेल.

 

बर्गर किंगने मागितली जाहीर माफी

ही जाहिरात रशियन सोशल मीडिया साइट वीकेवर टाकण्यात आली होती. या जाहिरातीवर युजर्सनी अतिशय तिखट प्रतिक्रिया नोंदवल्या. यानंतर ही अॅड हटवावी लागली. यामुळे बर्गर किंगने जाहीर माफीही मागितली आहे.

बर्गर किंगने एक स्पष्टीकरण दिले आहे की, ही अॅड प्रकाशित झाल्याचे कळताच काढून टाकण्यात आली आहे. ही अॅड आमच्या ब्रँडच्या पातळीला दर्शवत नाही. भविष्यात अशी गंभीर चूक होणार नाही.

 

यापूर्वीही आल्या आहेत वादग्रस्त जाहिराती

तथापि, बर्गर किंग वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2017 मध्ये बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीवरही बर्गर किंगने अशीच वादग्रस्त जाहिरात बनवली होती. तेव्हाही टीकेची झोड उठल्यामुळे त्यांना जाहिरात हटवावी लागली होती. 2009 मध्ये आलेल्या एका जाहिरातीतही अश्लीलता दाखवण्यात आली होती.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, वादग्रस्त जाहिरातीचे ट्विट... 

बातम्या आणखी आहेत...