आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वोइला डेस्मंड यांनी 72 वर्षांपूर्वी वर्णभेदाचा केला विरोध, आता कॅनडाने पहिल्यांदा नोटेवर महिलेचा छापला फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओटावा- कॅनडात ७२ वर्षांपूर्वी वोइला डेस्मंड यांनी वर्णभेदाविरोधात आंदोलन सुरू केले होते. मृत्यूच्या ५३ वर्षांनंतर त्यांच्या संघर्षाला नवी ओळख मिळाली. कॅनडा बँकेने शनिवारी १० डॉलरची नवीन नोट जारी केली. यात डेस्मंड यांच्या रूपाने पहिल्यांदा एखाद्या महिलेचा फोटो नोटेवर घेतला आहे. यासाठी मतदानात २६ हजार लोकांनी वोइला यांच्या फोटोसाठी मत दिले. १९४६ मध्ये वोइला यांनी कॅनडात सार्वजनिक जागी श्वेत वर्गासाठी आरक्षित असलेल्या जागेच्या नियमांविरुद्ध आवाज उठवला होता.  

 

कृष्णवर्णीय वोइला यांना चित्रपटगृहाच्या बाल्कनीतून उठवण्यात आले होते

वोइला यांचा जन्म १९१४ मध्ये झाला. त्या कॅनडातील नोवा स्कॉटिया क्षेत्रात सौंदर्य प्रसाधन उत्पादनाची कंपनी चालवत होत्या. १९४६ मध्ये त्या चित्रपटगृहात गेल्या. पुढील जागेवरील तिकीट न मिळाल्याने त्यांनी बाल्कनीचे तिकीट घेतले व सिटवर बसण्याऐवजी जमिनीवर बसल्या. त्याच वेळी काही लोक समोर आले आणि बाल्कनीची जागा श्वेत वर्गासाठी आरक्षित असल्याचे सांगून कृष्णवर्णीय ठरवत बाल्कनीच्या खाली जाऊन बसण्यास सांगितले गेले.वोइला यांनी विरोध करत उठण्यास नकार दर्शवला. त्यामुळे त्यांना भांडण करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली. त्या १२ तास तुरुंगात राहिल्या. १३०० रुपये दंड भरावा लागला. बाहेर येताच त्यांनी वर्णभेदाविरुद्ध आंदोलन सुरू केले. कॅनडातून त्यांना पाठिंबा मिळाला. १९६५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. २ वर्षांपूर्वी त्यांच्याच भागातील नोवा स्कॉटियाच्या पहिल्या आफ्रिकन लेफ्टनंट गर्व्हनर मयान फ्रान्सिस यांनी सभेत वोइला यांच्या योगदानाचे स्मरण केल्याने त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. एक कृष्णवर्णीय महिला दुसऱ्या कृष्णवर्णीय महिलेच्या अधिकारासाठी आवाहन करत असल्याचे मयान यांनी म्हटले होते. त्यानंतर वोइला यांचा फोटो नोटेवर छापण्याची मागणी झाली व कॅनडा बँकेने वोइला यांचा फोटो नोटेवर छापला.

बातम्या आणखी आहेत...