आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साबरमती आश्रमात पोहोचले कॅनडाचे PM; रजिस्टरवर लिहिले, हे शांतता व सत्याचे ठिकाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो सोमवारी अहमदाबादला सहकुटुंब पोहोचले. त्यांनी आपली पत्नी आणि तीन मुलांसह साबरमती आश्रमाला भेट दिली. आश्रमात ट्रुडो यांचे कुटुंब पारंपारिक भारतीय वेशात दिसून आले. यानंतर ते अक्षरधाम मंदिराच्या दिशेने निघाले. शनिवारपासून ते 7 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. 

 

ही शांतता आणि सत्याचे ठिकाण...
ट्रुडो यांनी साबरमती आश्रमातील विझिटर्स बुकमध्ये लिहिले, "ही सुंदर जागा शांतता, सत्य आणि सद्भावनेचे ठिकाण आहे." त्यांच्यासमवेत पत्नी सोफी आणि झेवियर, एला-ग्रेस, हॅड्रियन ही तीन मुले देखील आहेत. तत्पूर्वी त्यांनी रविवारी ताजमहाल आणि मथुरा सँक्चुरीला भेट दिली. 7 दिवसांच्या या दौऱ्यात ते अमृतसर आणि मुंबईला देखील भेट देणार आहेत. तसेच 23 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...