आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतका भीषण अपघात, की हवेत उडून दुसऱ्या मजल्याच्या खिडकीत अडकली कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - सोशल मीडियावर अपघाताचा हा फोटो व्हायरल होत आहे. ही दुर्घटना अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्नियात सोमवारी पहाटेच्या 5 च्या सुमारास घडली आहे. अपघात इतका भीषण होता की कार चक्क हवेत उडून थेट दुसऱ्या मजल्यावरील खिडकीत जाऊन अडकली. ही इमारत एका कार्यालयाची इमारत होती. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, कार तूफान गतीने जात असताना हा विचित्र अपघात घडला आहे.

 

जीवित हानी नाही, फक्त किर्कोळ जखमी
- विशेष म्हणजे, इतका भीषण अपघात झाला असतानाही यात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. 
- द वॉशिंग्टन पोस्टला प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका चालकासह एकूण दोनच जण तूफान गतीने प्रवास करत होते.
- अतिशय वेगात असताना ही कार एका गल्लीतून टर्न घेऊन दुसऱ्या रस्त्यावर आली. मुख्य रस्त्यावर आल्यानंतर कार तिरपीच चालत होती. तरीही ड्रायव्हरने स्पीड कमी केली नाही.
- याचवेळी अचानक ही गाडी रस्त्यावरील डिव्हायडरला इतकी जोरात धडकली, की हवेत 20-25 फुट उडून थेट त्याच ठिकाणी एका इमारतीमध्ये घुसली.
- क्षणार्धात झालेल्या या भीषण अपघातात कार दुसऱ्या मजल्यावरील एका खिडकीत जाऊन अडकली होती.
- सुदैवाने इमारत रहदारीची नव्हती. ते एका डेंटिस्टचे क्लिनिक होते. अगदी पहाटे हा अपघात घडल्याने त्यामध्ये कुणीही नव्हते.
- यासोबतच कार हवेत जोरात उडाली तरीही ती इमारतीच्या भिंतीला नाही तर काचेच्या खिडकीवर जाऊन आदळली. त्यामुळे, झटका तितका तीव्र नव्हता.
- कारमध्ये दोघांपैकी एक जण वेळीच खाली उतरला. तर ड्रायव्हरला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाची प्रतीक्षा करावी लागली.
- हे दोघेही फक्त किरकोळ जखमी असून त्यांना रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले आहेत. यासोबतच, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या अपघाताचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...