आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्पचा जुना इंटरव्ह्यू : डायनाबरोबर ठेवायचे होते संबंध पण वाटत होती एड्सची भिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटन - प्रिन्स हॅरी आणि प्रिन्सेस मेगन यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांचे एक वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आहे. ट्रम्प यांनी 1997 मध्ये प्रिन्सेस डायनाच्या मृत्यूनंतर काही महिन्यांत हे वक्तव्य केले होते. एका रेडिओ चॅनलशी बोलताना ट्रम्प तेव्हा म्हणाला होता की, त्याला प्रिन्सेस डायनाबरोबर संबंध ठेवण्याची इच्छा होती पण जर तिने एचआयव्ही टेस्ट केली असती तरच. प्रिन्सेस डायना ब्रिटिश रॉयल फॅमिलीची मेंबर होती. प्रिंस चार्ल्सची पहिली पत्नी णि प्रिन्स हॅरीची ती आई होती. 1997 मध्ये एका कार अपघातात तिचा मृत्यू झाला होता. 


डायनाचे कौतुक करायचे ट्रम्प 
2000 मझ्ये आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना ट्रम्प म्हणाले होते की, माझा संदर्भ डायनाच्या सौदर्याशी होता. ती अत्यंत आकर्षक होती. मी तिला अनेकदा पाहिले होते. ती खरंच किती सुंदर होती ह मला माहिती आहे. तिच्याकडे सर्वकाही होते. 


इंटरव्ह्यूमध्ये 10 टॉप हॉटेस्ट महिलांबाबत चर्चा 
ट्रम्प त्यांच्या या इंटरव्ह्यूमध्ये जगातील 10 टॉप हॉटेस्ट महिलांबाबत बोलत होते. त्यात त्यांनी डायनाला तिसरा क्रमांक दिला होता. दुसरा क्रमांक एक्स वाईफ इव्हानाला आणि सध्याची पत्नी मेलेनियाला पहिला क्रमांक दिला होता. ट्रम्प यांनी अॅजेलिना जोलीचे ओठ मोठे असल्याचे म्हणत विचित्र कमेंट केली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...