आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्राध्यक्ष बनण्याआधी Commando होत्या कोलिंदा, 8 भाषा अवगत; FIFA वर्ल्ड कपमुळे आल्या चर्चेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
> उत्तम नेमबाज आहेत कोलिंदा, नाटो सैनिकांचे धैर्य उंचावण्यासाठी अफगाणिस्तानातही गेल्या होत्या.
> 2015 मध्ये राष्ट्राध्यक्ष बनल्या कोलिंदा, त्याच वर्षी सुरू केले पीएचडीचे संशोधन.

 

जागरेब - क्रोएशिया भलेही फ्रान्सकडून फीफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामान्यात पराभूत झाला असेल. परंतु त्यांच्या राष्ट्राध्यक्ष कोलिंदा ग्रेबर किदारोविच (50) यांनी अवघ्या जगाची वाहवा मिळवली. त्या 1 जुलै रोजी इकोनॉमी क्लासमध्ये प्रवास करून रशियाला पोहोचल्या आणि प्रेक्षक गॅलरीत बसून आपल्या संघाला प्रोत्साहन देत राहिल्या. पराभवानंतरही त्यांनी क्रोएशियाई खेळाडूंची गळाभेट घेऊन दिलासा दिला. क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्षा कोलिंदा ग्रेबर या आर्मीत कमांडो राहिलेल्या आहेत. त्या उत्तम नेमबाजही आहेत. हार्वर्डमध्ये शिकलेल्या कोलिंदा यांना 8 भाषा अवगत आहेत.

 

29 एप्रिल 1968 रोजी जन्मलेल्या कोलिंदा यांनी इंग्लिश आणि स्पॅनिश लिटरेचरमध्ये ग्रॅज्युएशन केले तसेच आंतरराष्ट्रीय संबंधांवर त्यांनी पोस्ट ग्रॅज्यूएशन केलेले आहे. त्यांनी जगातील टॉप संस्थांपैकी जॉर्ज वॉशिंगटन, हार्वर्ड आणि जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतले. 2015 मध्ये त्या क्रोएशियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या. याच वर्षी त्यांनी जागरेब फॅकल्टीमध्ये इंटरनेशनल रिलेशनवर पीएचडी सुरू केली.

 

नाटोचे धैर्य उंचावण्यासाठी अफगाणिस्तानातही गेल्या: 
कोलिंदा 2007 ते 2011 पर्यंत अमेरिकेत क्रोएशियाच्या राजदूत होत्या. त्या पहिल्या महिला होत्या ज्या पब्लिक डिप्लोमेसीसाठी नाटोच्या असिस्टेंट सेक्रेटरी जनरल बनल्या. या पोस्टवर राहत असताना अनेकदा त्यांनी नाटो सैनिकांचे धैर्य उंचावण्यासाठी अफगाणिस्तानात भेटीही दिल्या. नाटो सर्कलमध्ये त्यांना SWAMBO (ज्यांचे सर्व ऐकतात) म्हटले जायचे. त्यांचे काम, शिस्त आणि समर्पणाचे कौतुक जॉर्ज डब्ल्यू. बुश आणि बराक ओबामा यांनीही केलेले आहे. कोलिंदा क्रोएशियन, इंग्लिश, स्पॅनिश आणि डॅनिश भाषा सफाईदारपणे बोलतात. त्या जर्मन, फ्रेंच, रशियन आणि इटालियन भाषाही चांगल्या बोलू आणि समजू शकतात. त्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅनुएल मॅक्रों यांच्याशी त्यांच्याच भाषेत सहजपणे संवाद साधतात.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...   

 

 

बातम्या आणखी आहेत...