आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • सद्दामच्या कब्रीतून मृतदेह गायब Saddam Hussain Dead Body Taken From Graveyard

सद्दाम हुसैनची डेडबॉडी कबरीतून अचानक गायब; विविध दावे, गूढ कायम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बगदाद - इराकचा तानाशहा सद्दाम हुसैनची डेड बॉडी कब्रस्तानातून गायब झाली आहे. इराकमध्ये ज्या ठिकाणी सद्दामची काँक्रीट कब्र होती, त्या ठिकाणी खोदकाम आणि तोडफोडीच्या खुणा सापडल्या आहेत. इराकी तानाशाहाला 2006 मध्ये अमेरिकेने युद्धात पराभूत करून फासावर लटकवले होते. यानंतर सद्दामचा मृतदेह दफनविधीसाठी बगदादला पाठवला होता. या रहस्यमयी घटनेवर विविध प्रकारचे दावे केले जात आहेत. त्यापैकीच एक सद्दामची मुलगी आपल्या वडिलांचा मृतदेह घेऊन निघाली असा दावा केला जात आहे. 

 

विविध प्रकारचे दावे
- सद्दामचे वंशज शेख मनफ अली अल-निदा यांनी दावा केला, की कुणीतरी सद्दामची कब्र खोदून मृतदेह बाहेर काढला आणि जाळून नष्ट केला. तर कबरीच्या सुरक्षेसाठी तैनात शिया निमलष्करी दलाने दावा केला, की दहशतवादी संघटना आयसिसने आपले सदस्य येथे सुरक्षेसाठी तैनात केले होते. आयसिसवर झालेल्या हवाई हल्ल्यात कब्र उद्ध्वस्त झाली. 
- तर सद्दामसाठी काम केलेल्या एका माजी सैनिकाने दावा केला, की सद्दामची निर्वासित मुलगी हाला एका प्रायव्हेट जेटने इराकला गुप्तरित्या आली होती. तीच आपल्यासोबत वडिलांची डेडबॉडी जॉर्डनला घेऊन गेली. मात्र, इराकच्या एका प्रोफेसरने सांगितल्याप्रमाणे, सद्दामची मुलगी हाला कधीच इराकला आली नाही. 

 

अल-अवजा येथे झाला होता दफनविधी
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रध्यक्ष जॉर्ज बुश यांनी स्वतः 30 डिसेंबर 2006 रोजी तानाशहाची डेडबॉडी अमेरिकन लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून इराकला रवाना केली होती. यानंतर बगदादच्या अल-अवजा येथे आणून दफनविधी करम्यात आला. मृतदेह रात्री आणला आणि पहाट होण्यापूर्वीच दफनविधी सुद्धा पूर्ण झाला. दरवर्षी सद्दामच्या जयंती निमित्त त्याचे समर्थक या ठिकाणी येतात. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...