आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इथे परंपरेच्‍या नावावर होतो असा अत्‍याचार; 900 वर्ष जुना आहे हा उत्‍सव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेपाळ- प्रत्‍येक ठिकाणाची आपली एक परंपरा, संस्‍कृती असते. यातून येणारे उत्‍सव आनंद आणि उत्‍साह आणतात. मात्र अनेक वेळेला हे उत्‍सव अंधश्रद्धेला बळी पडतात आणि त्‍यातून क्रूरतेचा जन्‍म होतो. नेपाळ मधील देवापोखरी येथील उत्‍सवातही अशाच क्रूरतेचे दर्शन घडते. 900 वर्षे जुन्‍या या उत्‍सवात एका बकरीला तलावत फेकल्‍या जाते आणि गावातील लोक त्‍या बकरीला मारण्‍यासाठी झटापट करत असतात.   


अनेक ठिकाणी तर या उत्‍सवामध्‍ये बळी देण्‍याचे प्रकारही आपल्‍याला पहायला मिळतात. इथे बकरीचा जीव घेतल्‍या जातो आणि त्‍यासाठी निवडलेला मार्ग अत्‍यंत क्रूर असतो. गावातील रुद्रायनी मंदीराजवळील तलावामध्‍ये पाच सहा महिण्‍याचे बकरीचे पिल्‍लू टाकले जाते. त्‍यानंर गावातील युवक त्‍या तलावात उतरतात आणि बकरीला ओढायला सुरवात करतात. तब्‍बल 45 मिनिटांचा हा खेळ असतो. यासोबत जेव्‍हा पर्यंत ती बकरी मरत नाही तेव्‍हा पर्यंत हा प्रकार सुरू असतो. याशीवाय गावातील लोक या उत्‍सवात धीम आणि देवी नृत्‍य पण करतात. यात नेवारी थाळी आणि वाइनही बनवली जाते. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, क्रूरतेचा कळस गाठणारे फोटो...

बातम्या आणखी आहेत...