आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Donald Trump Daughter In Law Admitted To Hospital After Opening Suspicious Envelope With White Powder

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुनेवर रासायनिक हल्ल्याचा प्रयत्न, रुग्णालयात दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सून व्हेनेसा हिला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. तिने जो लिफाफा उघडला, त्यामध्ये व्हाइट पावडर होते. त्यानंतर अचानक तिची प्रकृती बिघडली. लिफाफ्यात असलेले पावडर रसायन असून तो हल्ला होता असा संशय व्यक्त केला जात आहे. न्यूयॉर्कच्या अपार्टमेंटमध्ये तिने मंगळवारी सकाळी हे पाकिट उघडले होते. 

 

कोण आहे व्हेनेसा?
व्हेनेसा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा मुलगा डोनाल्ड ट्रम्प जुनिअरची पत्नी आहे. ट्रम्प जुनिअर हा ट्रम्प यांच्या माजी पत्नी इव्हाना यांचा मुलगा आहे. डोनाल्ड ट्रम्प जुनिअर आणि व्हेनेसा यांचा विवाह 2005 मध्ये झाला. 40 वर्षीय व्हेनेसा सध्या सुखरूप असून डॉक्टरांनी तिच्या जिवाला धोका नसल्याचे सांगितले आहे. तिने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत डॉक्टर, वेळेवर आलेली आपातकालीन यंत्रणा आणि प्रशासनासह सर्वांचे आभार मानले आहे. 

बातम्या आणखी आहेत...