आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीमध्ये आजपासून महिला चालवू शकतील कार, 9 महिन्यांपूर्वी उठवली होती बंदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- खोबर सिटीमध्ये मैत्रीणीबरोबर ड्रायव्हींगची मान्यता मिळाल्याचा आनंद साजरा करणारी महिला. 

- मानवाधिकार कार्यकर्ते अनेक वर्षांपासून सौदीत महिलांना ड्रायव्हींगची संधी मिळावी म्हणून प्रयत्न करत होते. 

 

रियाद - सौदी अरबमध्ये महिलांना ड्रायव्हींगसाठी लावण्यात आलेले निर्बंध रविवारपासून हटवण्यात आले. आता महिला अधिकृतपणे रस्त्यांवर कार चालवू शकतील. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या आदेशाने सौदी सरकारने याची घोषणा केली होती. याच महिन्यात महिलांना लायसन्स देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सौदी महिलांना ड्रायव्हींगची बंदी असलेला जगातील अखेरचा देश होता. प्रिन्स सलमानच्या व्हिजन 2030 नुसार सध्या येथे महिलांना अनेक क्षेत्रांत अधिकार दिले जात आहेत. 


महिलांनी उठवला होता आवाज 
महिलांना ड्रायव्हींगचा अधिकार मिळावा म्हणून अनेक मानवाधिकार कार्यकर्ते अनेक वर्षांपासून झटत होते. मानवाधिकार संघटना अॅम्नेस्टी इंटरनॅशनलनुसार यासाठी झटणाऱ्या 8 कार्यकर्त्यांवर सौदीत खटले सुरू असून त्यांना अनेक वर्षांची शिक्षा होऊ शकते. रियादमध्ये 1990 च्या काळात अनेक महिलांना ड्रायव्हींग केल्याने अटक केली होती. पण 2008 आणि 2011 ते 2014 दरम्यान अनेक महिलांनी सौदी सरकारच्या विरोधात कारच चालवत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केले होते. 


व्हिजन 2030 चा परिणाम  
सौदी अरब पूर्णपणे तेल-गॅस आणि हज यात्रा यावर अवलंबून आहे. प्रिन्स सलमान यांना व्हिजन 2030 च्या माध्यमातून ही परिस्थिती बदलायची आहे. अर्थव्यवस्थेत वैविध्य यावे यासाठी ते विविध उत्पादन आणि सेवा क्षेत्र सुरू करण्याच्या तयारीत आहेत. नुकतेच सौदीत महिलांना त्यांना हवे ते व्यवसाय सुरू करण्याचा अधिकार मिळाला आहे. तसेच महिलांवर स्टेडियममध्ये जाण्यास असलेली बंदीही हटवण्यात आली आहे. प्रिन्स यांना अधिकाधिक लोकांना अर्थव्यवस्थेचा एक भाग बनवायचे आहे. पण देशातील कट्टरतावादी संघटना मात्र याच्या विरोधात आहेत. 

 

 

बातम्या आणखी आहेत...