आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक छळाच्या अाराेपामुळेे दिग्गज कवीचे प्रदर्शन दक्षिण कोरियात रोखले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल- दक्षिण काेरियातील नामांकित कवी काे उन यांचे सध्या देशाची राजधानी सेऊलमध्ये सुरू असलेले प्रदर्शन थांबवण्यात अाले अाहे. उन यांच्यावर कथितरीत्या करण्यात अालेल्या लैंगिक छळाच्या अाराेपामुळे सरकारने हे पाऊल उचलले. तसेच त्यांच्याकडे साेपवण्यात अालेले पुस्तकाचे कामदेखील काढून घेण्याचा विचार देशाचे शिक्षण मंत्रालय करत अाहे.  


देशातील प्रसिद्ध कवी उन हे अागामी साहित्यातील नाेबेल पुरस्काराचे माेठे दावेदार मानले जात अाहेत. यंदाचा नाेबेल पुरस्कार त्यांनाच मिळेल, अशी अाशा नागरिकांना वाटत अाहेेे; परंतु त्यापूर्वीच त्यांच्यावर लैंगिक छळाचे अाराेप झाल्याने देशातील साहित्य क्षेत्रात खळबळ उडाली अाहे. मात्र, उन यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे हे अाराेप फेटाळून लावले अाहेत. अशा प्रकारच्या अाराेपांचा सामना त्यांना देशात प्रथमच करावा लागत अाहे. कवयित्री चाेई यंुग-मी यांनी त्यांच्या गतवर्षी डिसेंबरमध्ये प्रकाशित झालेल्या ‘दानव’ या कवितेत इन नावाच्या एका ज्येष्ठ कवीने लैंगिक छळ केल्याचे वर्णन केले अाहे. त्या अाराेपांचा संदर्भ काे उन यांच्याशी  जाेडला जात अाहे. तथापि, अाराेपांच्या सत्यतेबाबत देशात संभ्रमाचे वातावरण अाहे. चाेई यांनी गत महिन्यात एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत देशातीलच एका प्रसिद्ध कवीने महिला कवयित्रीचा छळ केल्याचे म्हटले हाेते. तसेच हे घडले असल्याचे ठासून सांगितले हाेते.  
काे उन यांनी गत रविवारी ‘गार्डियन’मधून हे अाराेप चुकीचे असल्याचे म्हटले हाेते. 

बातम्या आणखी आहेत...