आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आइन्स्टाइनचे प्रेमपत्र 4 लाखांत विकले; बहिणीच्या शेजारी राहणाऱ्या मुलीवर होते प्रेम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आइन्स्टाइन यांचे प्रेमपत्र. - Divya Marathi
आइन्स्टाइन यांचे प्रेमपत्र.

जेरुसलेम- महान वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी ९७ वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका प्रेमपत्राचा इस्रायलची राजधानी जेरुसलेममध्ये लिलाव झाला. त्याला ४ लाख रुपये मिळाले. आइन्स्टाइन यांनी हे प्रेमपत्र १९२१ मध्ये आपल्यापेक्षा २० वर्षांनी लहान इटलीची वैज्ञानिक एलिझाबेट्टा पिकिनीला लिहिले होते. तेव्हा आइन्स्टाइन यांचे वय ४२, तरे पिकिनीचे वय २२ वर्षे होते.

 

पिकिनी आइन्स्टाइनच्या बहिणीची शेजारी राहत होती. इटलीच्या फ्लॉरेन्स शहरात ज्या इमारतीत आइन्स्टाइन यांची बहीण राहत होती, तेथेच पिकिनीही राहत होती. लिलाव करणाऱ्या संस्थेचे मुख्य अधिकारी गेल वेनर यांनी सांगितले की, ‘पत्रात अशा काही गोष्टी आहेत की आइन्स्टाइन यांनी आज ते लिहिले असते तर तेही मी-टू कँपेनचे लक्ष्य ठरले असते.’ मी-टू कँपेन २०१७ मध्ये जगभर सुरू झाले होते. त्यानुसार ज्या महिला लैंगिक छळाच्या बळी ठरल्या होत्या त्या महिलांनी आवाज उठवला होता.  या कँपेनचा उल्लेख करताना गेल विनर म्हणाले की, ‘सध्या सुरू असलेल्या मी-टू कँपेनबाबत आपणा सर्वांना माहिती आहेत. जर असे कँपेन १९२१ मध्ये सुरू असते तर या पत्रासाठी आइन्स्टाइनही आरोपी ठरले असते.’ हे पत्र लिहिण्याच्या काही दिवस आधीच आइन्स्टाइन बहिणीला भेटण्यासाठी फ्लोरेन्सला गेले होते. तेथेच त्यांची भेट पिकिनीशी झाली, तीही वैज्ञानिक होती. आइन्स्टाइन पिकिनीकडे आकर्षित झाले आणि अमेरिकेला परतल्यावर त्यांनी पत्रात लिहिले-‘हे पत्र एका वैज्ञानिकासाठी, जिच्यासोबत मी २ दिवस मित्रासारखा राहिलो.’ आइन्स्टाइन यांनी या पत्रात पिकिनीला भेटण्याची इच्छा दर्शवली होती. मात्र, पिकिनी अशा प्रसिद्ध व्यक्तीला भेटण्यास घाबरत होती. नंतर तिने हा प्रस्ताव रद्द केला. त्यामुळे हे प्रकरण तेथेच संपले.


सापेक्षतावाद सिद्धांतावर लिहिलेली टिप्पणीही ६७ लाखांत विकली  
आइन्स्टाइनच्या‘सापेक्षतावाद सिद्धांता’वर लिहिलेल्या टिप्पणीचाही लिलाव झाला. १९२८ मध्ये लिहिलेली ही टिप्पणी ६७ लाख रुपयांत विकली गेली. या सिद्धांतात आइन्स्टाइनने प्रकाशाच्या गतीवर शोध लावला होता. 

बातम्या आणखी आहेत...