आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपणही करता हवाई प्रवास? तर वाचा, ही एअरलाइन्स देणार नाही Hindu Food

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली / दुबई - संयुक्त अरब अमिरातची हवाई कंपनी एमिरेट्सने आपल्या जेवणाच्या मेन्युतून 'हिंदू जेवण' बाद करत असल्याची घोषणा केली आहे. यापुढे भारतीयांना एमिरेट्स एअरलाइन्समध्ये हिंदू जेवण मिळणार नाही. यापुढे विमान प्रवाशांना मांसाहारी किंवा शाकाहारी फूड यातून निवड करावी लागणार आहे. हे खाद्यपदार्थ त्या-त्या देश आणि ठिकाणांना डोळ्यासमोर ठेवून केले जातील असे कंपनीने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 


का घेतला निर्णय, कसा राहील नवा मेन्यु?
- Emirates ने आपल्या विमानातील खाद्य पदार्थांचा मेन्यु कार्ड बदलला आहे. नव्या मेन्युमध्ये हिंदू फूड हा शब्द काढण्यात आला आहे. यापुढे विमान प्रवाशांना व्हेज जैन मील, कोशेर मील, नॉन-बीफ नॉन व्हेज मील असे खाद्य पदार्थ दिले जाणार आहेत. विमान कंपनीने सांगितल्याप्रमाणे, विमानात दिल्या जाणारे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 
- कंपनीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, "ग्राहकांना विमानात दिल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवांचा नेहमीच रिव्ह्यू घेतला जातो. त्याच रिव्ह्यूमध्ये हिंदू मील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे सर्वेक्षण विमानात प्रवास करणाऱ्या ग्राहकांकडून घेतले जाते. त्यांना दिल्या जाणाऱ्या सेवांवर मिळणाऱ्या प्रतिक्रियेनुसार बदल केला जातो. जास्तीत-जास्त चांगल्या सेवा देणे हे आमचे लक्ष्य आहे." 
- एमिरेट्स एअरलाइन्समध्ये दिल्या जाणारा प्रत्येक खाद्यपदार्थ वस्तू आणि सेवा सुद्धा ग्राहकांच्या सल्ल्यानुसार दिल्या जातात. तसेच ग्राहकांना ऑफर केले जाणारे फूड डायटिंग आणि आरोग्याच्या सर्व निकषांवर खरे ठरले आहेत. असा दावा सुद्धा कंपनीने केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...