आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्कीचे Supreme Leader बनले एर्दोगान; पंतप्रधान पद रद्द, नवीन राज्यघटना लागू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंकारा - तुर्कीचे सर्वात शक्तीशाली नेते रिसेप तेय्यिब एर्दोगान पुन्हा राष्ट्राध्यक्ष पदावर निवडून आले आहेत. निवडणुकीत 4 प्रमुख उमेदवार असताना सुद्धा त्यांना एकट्याला तब्बल 52.5 टक्के मते मिळाली आहेत. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 87 टक्के मतदान झाले आहे. एरदोगान गेल्या 15 वर्षांपासून पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष अशा पदांवर सत्ता भोगत आहेत. त्यांच्या पुन्हा सत्तेवर येताच त्यांनी तयार केलेली देशाची नवीन राज्यघटना अंमलात येणार आहे. त्यानुसार, एक राष्ट्राध्यक्ष म्हणून एर्दोगान यांना इतके अधिकार देण्यात आले आहेत की ते तुर्कीचे सुप्रीम लीडर बनले आहेत. 

 

15 वर्षांपासून सत्तेवर एर्दोगान...
> 2014 मध्ये सर्वप्रथम तुर्कीचे राष्ट्रपती बनलेले रिसेप तेय्यिब एर्दोगान तत्पूर्वी 11 वर्षे तुर्कीचे पंतप्रधान होते. त्यांनी राष्ट्रपती असताना हे पद राष्ट्राध्यक्ष असे परिवर्तित केले. अर्थात एकूणच ते 15 वर्षांपासून सत्तेवर आहेत.
> 2016 मध्ये सत्ता उलथवण्याचा कथित प्रयत्न झाला. यानंतर त्यांच्या समर्थकांची संख्या कमालीची वाढली. त्यांनी राज्यघटनेत बदल केले. तसेच नवीन राज्यघटनेचा प्रस्ताव मांडला. यात राष्ट्राध्यक्षांना विशेष अधिकार देण्यात आले. तसेच विरोधी पक्षाचे नेते, अधिकारी, न्यायाधीश आणि पत्रकारांसह 1,60,000 आरोपींना अटक करण्यात आली.
> एरदोगान पुन्हा निवडून आल्यानंतर नवीन राज्यघटना अंमलात येणार होती. त्यांच्या विजयासह ती अंमलात आली आहे. त्यानुसार, राष्ट्राध्यक्ष म्हणून एर्दोगान यांना संपूर्ण अधिकार मिळाले आहेत. अर्थात कुठलाही कायदा मंजूर करण्यासाठी त्यांना संसदेची गरज नाही. अशा पद्धतीने ते कितीही वेळा राष्ट्राध्यक्ष निवडणूक लढवू शकतील. पुढील आणखी 15 वर्षे ते देशावर सत्ता गाजवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


पंतप्रधान पद रद्द!
संसदीय निवडणुकीत सुद्धा एरदोगान यांच्या एके पक्षाला सर्वाधिक 42 टक्के मते मिळाली आहेत. 600 सदस्य संख्या असलेल्या तुर्कीच्या संसदेत एकट्या एकेपीच्या 293 सदस्यांचा समावेश आहे. विरोधकांची संख्या कमी असल्याने त्यांना कुणीही थांबवू शकणार नाही. सोबतच नवीन राज्यघटनेनुसार, सर्वच अधिकार राष्ट्राध्यक्षांना असल्याने पंतप्रधान हे पद रद्द करण्यात आले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...