आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CURSE: येथे शाप आहे गर्भधारणा, दरवर्षी 2 लाख महिलांचा मृत्यू; समोर आल्या सत्यकथा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गर्भधारणा येथील महिलांसाठी अभिशाप बनली आहे. - Divya Marathi
गर्भधारणा येथील महिलांसाठी अभिशाप बनली आहे.

इंटरनॅशनल डेस्क - आई होण्याची भावना जगातील सर्वात सुखद भावना असल्याचे म्हटले जाते. परंतु, आफ्रिकेत राहणाऱ्या या महिलांसाठी गर्भधारणा एक शाप बनली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, गरीब आफ्रिकी देशांमध्ये दरवर्षी बाळाला जन्म देताना सरासरी 2 लाख महिलांचा मृत्यू होतो. यात इथियोपिया, मालावी, युगांडा आणि डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो इत्यादी देशांचा समावेश आहे. सोशल डाक्यूमेंट्री फोटोग्राफर पोलो पॅट्रनो यांनी स्वतः या भागांचा 6 महिन्यांचा दौरा केला. तसेच येथील महिलांच्या वेदना जाणून घेतल्या. त्यांनी फोटोशूटच्या माध्यमातून त्यांच्या सत्यकथा व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. 


आरोग्य सुविधाच नाही...
पोलो यांनी आफ्रिकी गावांमध्ये मॅटर्निटी वार्ड्सच्या आत जाऊन काही फोटो टिपले आहेत. सुरुवातीला पोलो यांना वार्डात जाण्यापासून रोखण्यात आले. त्यांच्या कामाला स्थानिकांकडून मोठा विरोध झाला. परंतु, त्यांनी स्थानिकांना आपला हेतू सविस्तर समजावून सांगितल्यानंतर त्यांना परवानगी मिळाली. यातील एक-एक छायाचित्र टिपण्यासाठी पोलो यांनी तासंतास वार्डाबाहेर प्रतीक्षा केली आहे. या देशांमध्ये सामान्य रुग्णांसाठी सुद्धा कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत. दूरस्थ रुग्णालय गाठण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे वाहतूकीची व्यवस्था नाही. अशात अनेक महिलांचा वाटेतच मृत्यू होतो. मॅटर्निटी वार्डमध्ये सुद्धा प्रशिक्षित डॉक्टर आणि सर्जन नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. 


साऱ्या जगाचे लक्ष वेधले
पोलो यांनी आपल्या फोटो सिरीझला 'बर्थ इज अ ड्रीम' असे नाव देऊन मोहिम राबवली. सोशल मीडियावर यातील फोटो पोस्ट होताच त्यांनी आंतरराष्ट्रीय संस्थांचे लक्ष वेधले. पोलो यांनी सांगितल्याप्रमाणे, अजुनही अशा अनेक महिलांच्या कथा आहेत, ज्या गावाबाहेर आलेल्या नाहीत. त्यामुळे, पुन्हा आफ्रिकेत जाऊन ते जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या मातांच्या वेदना व्यक्त करणारे फोटो...

बातम्या आणखी आहेत...