आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • मोठी बातमी: Facebookला कबूल युजरच्या की बोर्ड अन् माऊसच्या मूव्हमेंटवरही ठेवतात नजर; फोनमध्ये किती बॅटरी याचीही माहिती Facebook Admits Users Keyboard And Mouse Under Surveillance

युजर्सच्या की-बोर्डसह माऊसच्या हालचालीवर असते लक्ष; फोनमधील बॅटरीची माहितीही असते फेसबुककडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया - खासगी माहिती, आवड - नावड जाणून घेण्यासाठी युजर्सच्या कॉम्प्युटरच्या की-बोर्डसह माऊसची हालचालींवरही लक्ष ठेवले जात असल्याचे फेसबुकने कबूल केले आहे. याचाच अर्थ तुमच्या कॉम्प्युटरवर फेसबुक लॉगइन असेल तर माऊसने केलेला प्रत्येक क्लिक आणि की-बोर्ड वापराची माहिती फेसबुकपर्यंत पोहोचत आहे. 

या पद्धतीच्या माहितीद्वारे युजर कुठल्या कंटेटवर किती वेळ थांबतो याची माहिती फेसबुककडे पोहोचत आहे. त्या दृष्टिकोनातूनच युजर्सला जाहिराती दाखवल्या जातात. केम्ब्रिज अॅनालिटिकाचा डाटा लीक झाल्यानंतर फेसबुकच्या खासगी धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. यूएसच्या सिनेटमध्ये फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्गला २ हजार प्रश्न विचारण्यात आले. काहींची उत्तरे तत्काळ देण्यात आली. पण काही प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. फेसबुकने ४५४ पानांमध्ये  २ हजार प्रश्नांची उत्तरे दिली.
 
डिव्हाइसची माहिती : तुम्ही ज्या कॉम्प्युटर, मोबाइल वा डिव्हाइसवर फेसबुक लॉग इन करता त्याची माहिती फेसबुक मिळते. उदा. डिव्हाइसमध्ये किती स्टोरेज उरले, कोणते फोटो आहेत, कोणाचे नंबर सेव्ह आहेत, याची माहिती.
 
अॅपची माहिती : युजरच्या डिव्हाइसमध्ये कोणते अॅप आहेत, युजर कोणत्या अॅपला किती वेळ देतो याची माहिती फेसबुकला असते. याद्वारे मिळणाऱ्या माहितीला डाटाबेसमध्ये युजर प्रोफाइलसह सेव्ह केले जात आहे.
 
डिव्हाइस कनेक्शन : युजर कोणत्या नेटवर्कचा, वायफायचा वापर करत आहे हे फेसबुकला माहिती आहे. फेसबुक डिव्हाइस जीपीएसवर नजर ठेवत असतो. त्यामुळे फेसबुकला युजरच्या लोकेशनची माहिती मिळत असते. 
 
बॅटरी लेव्हल : युजरच्या डिव्हाइसच्या बॅटरी लेव्हलवर फेसबुक निगराणी ठेवतो. याद्वारे फेसबुक अॅप युजरच्या डिव्हाइसची अधिक बॅटरी तर वापरत नाही ना याची खात्री केली जाते व अॅप अपडेट करण्यात येतो.

 

बातम्या आणखी आहेत...