Home | International | Other Country | Facebook data leak case: Zuckerberg apologizes to US Congress

फेसबुक डेटा लीक प्रकरण: अमेरिकी काँग्रेससमोर झुकेरबर्ग यांची माफी

वृत्तसंस्था | Update - Apr 11, 2018, 03:12 AM IST

ब्रिटिश कंपनी केंब्रिज अॅनालिटिकाशी वापरकर्त्यांचा डेटा शेअर केल्याप्रकरणी जगभरातून टीका हाेत असलेले फेसबुकचे संस्थापक म

  • Facebook data leak case: Zuckerberg apologizes to US Congress

    वाॅशिंग्टन - ब्रिटिश कंपनी केंब्रिज अॅनालिटिकाशी वापरकर्त्यांचा डेटा शेअर केल्याप्रकरणी जगभरातून टीका हाेत असलेले फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग हे मंगळवारी अमेरिकी काँग्रेसच्या सिनेट समितीसमाेर हजर झाले. सुमारे ४४ खासदारांनी त्यांना विविध प्रश्न विचारले. या वेळी सुमारे इतर २०० नागरिकही उपस्थित हाेते.


    तत्पूर्वी झुकेरबर्ग यांनी समितीला दिलेल्या खुलाशात डेटा लीकप्रकरणी अमेरिकी काँग्रेसची माफी मागितली. तसेच ८.७० काेटी वापरकर्त्यांच्या डेटा सुरक्षिततेची जबाबदारी अामची हाेती; परंतु अाम्ही त्यात कमी पडलाे. त्यासाठी याेग्य पावले उचलली नाहीत. त्यामुळे मला माफ करा, असे म्हटले अाहे. तसेच अशी चूक पुन्हा हाेऊ नये म्हणून नियम अधिक कठाेर केले जातील; जेणेकरून काेणतीही विदेशी शक्ती अमेरिकेतील निवडणुकांना प्रभावित करू शकणार नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. अमेरिकी प्रतिनिधी मंडळाने झुकेरबर्ग यांचा माफीनामा जाहीर केला. भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री १२ वाजता झुकेरबर्ग यांची सुनावणी सुरू झाली.

Trending