आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Whatsapp वर पाहताक्षणी डिलीट करा हा मेसेज! चुकूनही करू नका क्लिक...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - व्हॉट्सअप संदर्भात मोबाईलमध्ये किंवा व्हॉट्सअॅपवर सुद्धा अशा प्रकारचा मेसेज आल्यास वेळीच सावध व्हावे. सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर अनेक लोक विविध प्रकारच्या तक्रारी करून या मेसेजसंदर्भात लोकांना जागृक करत आहेत. त्यापैकी काहींनी सायबर सेलकडे यासंदर्भात तक्रारही केली आहे. ब्रिटनच्या सायबर गुन्हे शाखेने अधिकृतरीत्या लोकांना हा मेसेज क्किल करू नये असा सल्ला दिला आहे. 

 

काय आहे या मेसेजध्ये...
व्हॉट्सअॅप किंवा मेसेजबॉक्समध्ये येणारा हा संदेश लोकांना आपल्या व्हॉट्सअॅपची मुदत संपुष्टात येत असल्याचे सांगते. वेळीच अपडेट करून ठराविक रक्कम न भरल्यास आपले व्हॉट्सअॅप बंद पडेल असा इशारा दिला जात आहे. ब्रिटनमध्ये सर्वप्रथम हा मेसेज पसरवण्यात आला. त्यात अनेकांनी लिंकवर क्लिक करताच मोबाईलमध्ये व्हायरस आल्याचे म्हटले आहे. हा लोकांची फसवणूक करण्याचा एक प्रकार आहे. यात आपले मोबाईल दूषित किंवा हॅक देखील होऊ शकते. ब्रिटन व्यतिरिक्त किती देशांमध्ये आणि किती लोकांना हा मेसेज आला हे अद्याप स्पष्ट नाही.


व्हॉट्सअॅप मोफतच...
सुरुवातील व्हॉट्सअॅप एका वर्षानंतर ग्राहकांना ठराविक रक्कम आकारणार अशी चर्चा होती. पण, फेसबूकने 2016 मध्ये व्हॉट्सअॅप विकत घेतले. तेव्हापासूनच हे अॅप आयुष्यभरासाठी फ्री राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतरही वेळोवेळी व्हॉट्सअॅपच्या नावे विविध प्रकारच्या अफवा पसरवण्यात आल्या. हा त्याचाच एक भाग आहे. भारतात अशा प्रकारचा मेसेज आल्यास डिलीट करणे अती उत्तम...

बातम्या आणखी आहेत...