आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्वालालंपूर - तब्बल 14 फुटांचा किंग कोबरा साप किस करून जगभरात चर्चेत आलेला मलेशियन युवक अबु झरीन हुसेनचा साप चावल्यानेच मृत्यू झाला आहे. गेल्या काही वर्षांत त्याने आपल्या घरात जगातील सर्वात विषारी सर्प किंग कोबरा पाळले होते. तो मलेशियातील बेन्तोंग प्रांतात अग्निशमन आणि बचाव कार्य विभागात कार्यरत होता. विविध व्हिडिओ आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याने आपण किंग कोबरा सापांसोबत फुटबॉल खेळतो आणि त्यांना गोष्टी ऐकवतो असा दावा केला होता. पण, याच सवय आणि शौकने त्याचा जीव घेतला आहे.
असा झाला मृत्यू
अबु झरीन हुसेन आपल्या कार्यालयात असताना त्याला एका घरात किंग कोबरा सापडल्याचा कॉल आला. तेच पकडण्यासाठी तो स्वतः निघाला. पण, त्या ठिकाणी साप शोधत असतानाच त्याच्यावर किंग कोबराने अचानक हल्ला केला. पहिल्याच चावात डुलक्या मारणाऱ्या अबुला त्या सापाने तब्बल 8 वेळेस चावले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोपर्यंत तो कोमात गेला होता. तसेच उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अबु हुसेनचे आणखी काही फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.