आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

93 बॉम्बस्फोटाचा आरोपी फारुख टकला भारतात, आज टाडा कोर्टात होणार हजेरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई / मुंबई - 1993 मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपींपैकी एक आणि गँगस्टर दाऊद इब्राहिमचा खास मोहम्मद फारुख उर्फ फारुक टकला याला भारतात आणण्यात आले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, दुबईतून अटक करण्यात आलेल्या फारुक टकला याला बुधवारीच भारतात प्रत्यर्पणाची प्रक्रिया पूर्ण झाली. तसेच त्याला मुंबईतील विशेष टाडा न्यायालयात गुरुवारी हजर केले जाणार आहे. तो सध्या सीबीआयच्या तावडीत असून अधिकारी त्याची कसून चौकशी करत आहेत. 

 

इंटरपोलच्या माहितीनुसार, टकला विरोधात खून, गुन्हेगारी षडयंत्र, अवैध शस्त्र बाळगणे आणि दहशतवादासह विविध आरोप आहेत. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी माफिया डॉन दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन यांच्यासह एकूणच 28 आरोपी आहेत. त्यापैकी मुस्तफा दोसासह 6 जणांना सप्टेंबरमध्ये दोषी मानत शिक्षा देखील सुनावण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन अबु सालेमला याच प्रकरणात जन्मठेप सुनावण्यात आला आहे. तर, मुस्तफा दोसा याचा वयाच्या 60 व्या वर्षी 28 जून रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...