आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मोठ-मोठ्या बॉडी बिल्डरांना लाजवणारी रशियाची फीमेल बिल्डर नतालिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - रशियातील प्रसिद्ध बॉडी बिल्डर नतालिया कुझनेत्सोव्हा आपल्या इंस्टाग्राम फोटोंमुळे नेहमीच चर्चेत राहते. नतालियाने सोशल मीडियावर आपल्या इंटेन्स वर्कआउट आणि पिळदार बायसेप्सचे फोटो शेअर केले आहेत. नुकतेच तिने बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रात कमबॅक करत असल्याची घोषणा केली. उल्लेखनीय बाब म्हणजे, बॉडी बिल्डिंगमध्ये 6 टायटल्स जिंकलेल्या नतालियाने गतवर्षी निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. मात्र, बॉडी बिल्डिंगचा मोह अजुनही सुटला नसल्याने तिने पुन्हा जोरदार रीएन्ट्री केली. 

 

वयाच्या 14 व्या वर्षापासून घेते ट्रेनिंग...
> नतालियाने सांगितल्याप्रमाणे, तिला लहानपणापासूनच बॉडी बिल्डिंगचा छंद होता. वयाच्या 14 व्या वर्षीच तिने जिम जॉइन करून प्रोफेशनल ट्रेनिंग सुरू केली होती. 
> जिम जॉइन केले त्यावेळी तिचे वजन 40 किलो होते तेव्हाच आपले शरीर केवळ बॉडी बिल्डिंगसाठी बनल्याचे तिच्या लक्षात आले होते. 
> वर्ल्ड पावर लिफ्टिंग चॅम्पियन नतालिया तीनवेळा बेंच प्रेस आणि तीनदा बार डेडलिफ्ट चॅम्पियन राहिली आहे. आता ती स्पर्धांमध्ये सहभाग घेतानाच कोचिंग सुद्धा देणार आहे. 
> एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले होते, की तिने आपले मसल्स कडक ठेवण्यासाठी एस्ट्रोजेन ब्लॉकरचा देखील वापर केला आहे. 
> नतालियाचे वजन सध्या 90 किलो आहे त्यामध्ये आणखी वाढ करण्याचा ती प्रयत्न करत आहे. यासाठी ती दररोज 6-7 तास जिममध्ये वेळ घालवतो. 
> ती सध्या जिममध्ये ट्रेनर म्हणूनही काम करते. इंस्टाग्रामवर तिचे जवळपास 2 लाख फॉलोअर्स आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, नतालियाचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...