आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Germany: विमानात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे प्रवाश्यांच्या तोंड, कानातून रक्तस्राव; आपातकालीन लॅन्डिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्लिन - रायनएअरच्या फ्लाइटमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 33 प्रवाशांच्या नाका-तोंडातून रक्तस्राव झाला. आयरलंडच्या डबलिनहून क्रोएशियाच्या जदारच्या दिशेने निघालेल्या विमानात शनिवारी हा प्रकार घडला. प्रवाशांनी अचानक श्वास घेण्यात अडथळा होत असल्याची तक्रार केली. त्यावेळी विमान तब्बल 37 हजार फुटांवर होते. विमानाने त्यांना वेळीच ऑक्सिजन मास्क लावले. तसेच विमानाला जर्मनीच्या फ्रँकफर्ट विमानतळावर लॅन्ड करावे लागले. विमानतळावर पोहोचताच सर्व प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच उपचार करून सुटी दिली. 

 

7 मिनिटांत 27 हजार फुट खाली आले विमान
एअरलाइन्स कंपनीने सांगितल्याप्रमाणे, कॅबिन प्रेशर कमी झाल्याने ही घटना घडली आहे. परंतु, कॅबिन प्रेशर कमी का झाले यासंदर्भात माहिती दिली नाही. विमान आणि नागरी उड्डयनावर लक्ष ठेवणारी वेबसाइट फ्लाइट रडारच्या माहितीनुसार, घटना घडली त्यावेळी विमानाने 80 मिनिटांची उड्डान घेतली होती. विमान तब्बल 37 हजार फुट उंचीवर होते. वैमानिकाने त्यावेळी फक्त 7 मिनिटांत विमान 37 हजार फुट उंचीवरून 10 हजार फुटांवर आणले. 


प्रवाशी संतप्त
उपचार झाल्यानंतर प्रवाशांनी रायनएअरवर संताप व्यक्त केला. या घनटेसाठी विमान कंपनीचे स्टाफ जबाबदार आहे असे आरोप लावले. त्यापैकीच एक प्रवासी मिनेरवाने सांगितल्याप्रमाणे, लॅन्डिंग झाल्यानंतर सुद्धा स्टाफने 45 मिनिटे आम्हाला विमानातून बाहेर उतरू दिले नाही. तर कॉनर नावाच्या एका प्रवाशाने सांगितले, की एअरपोर्ट स्टाफ आणि रेडक्रॉसच्या कर्मचाऱ्यांनी आमची मदत केली. परंतु, रायनएअरचा एकही कर्मचारी आमची मदत करण्यासाठी समोर आला नाही.

बातम्या आणखी आहेत...